निम्हण रुसले,कोपऱ्यात बसले, सीएम गेले पुसायला!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सध्या स्वपक्षीय आमदाराची मनधरणी करण्याची पाळी आलीय. पुण्यातले काँग्रेसचे नाराज आमदार विनायक निम्हण यांची समजूत काढण्यासाठी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली.
Mar 26, 2014, 06:39 PM ISTआता... औषधं मोफत, झोपड्यांचं हस्तांतरणही शक्य!
निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं जनतेला आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात अनेक घोषणा केल्या आहेत.
Feb 26, 2014, 09:09 PM ISTआंदोलन फसलं... 'चर्चा' तर होणारच!
टोलच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुरू केलेलं रास्ता रोको आंदोलन अवघ्या ३६० मिनिटांत संपलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी सकाळी चर्चेसाठी बोलावल्यानं, राज ठाकरेंनी ३६० अंशात यू टर्न घेत, आंदोलन मागे घेतलं. चर्चाच करायची होती, तर आजचं आंदोलन करून राज ठाकरेंनी काय साधलं? असा सवाल उपस्थित केला जातोय.
Feb 12, 2014, 06:31 PM ISTराज ठाकरे - मुख्यमंत्री चर्चा मीडियासमोर?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पोलिसांनी अडिच तास ताब्य़ात घेतल्यानंतर सोडून देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फोन करून चर्चेचं आमंत्रण दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा राज ठाकरेंनी केलीय.
Feb 12, 2014, 05:18 PM ISTयंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा मरीन ड्राईव्हवर!
मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी आज एक महत्त्वाची घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाचा प्रजासत्ता दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क ऐवजी मरीन ड्राईव्हवर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यादृष्टीने नियोजनाच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
Jan 2, 2014, 09:33 PM IST`आदर्श`वरून काँग्रेसनंच केली मुख्यमंत्र्यांची गोची!
आजपर्यंत स्वच्छ प्रतिमा जपलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदर्श अहवाल प्रकरणात काहीसे नाराज झालेत. राहुल गांधी यांनी आदर्शच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असं वक्तव्य करुन मिस्टर क्लिन यांना तोंडघशी पाडलंय… तर मुंबई काँग्रेसनंही मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिलाय.
Dec 29, 2013, 11:17 AM ISTकाँग्रेसचं सरकार चालवतं तरी कोण, उद्धव ठाकरेंचा सवाल
आदर्श प्रकरणी राज्य सरकारनं पुनर्विचार करावा, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.
Dec 28, 2013, 08:58 PM ISTमराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर ‘ऑस्ट्रेलियन’ उत्तर!
मराठवाड्याचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे त्यात समन्यायी पाणीवाटप करण्याची सातत्याने मागणी होतेय. याच प्रश्नावर आता राज्य सरकार ‘आस्ट्रेलियन’ तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.
Dec 5, 2013, 10:12 AM ISTपृथ्वी`राजकन्ये`चा विवाह, साधेपणाचा ‘आदर्श’!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय नेत्यांपुढं नवा `आदर्श` घालून दिलाय. कसलाही थाटमाट किंवा बडेजाव न मिरवता, अत्यंत साधेपणानं त्यांनी आपली लाडकी कन्या अंकिता आणि दिल्लीतील व्यावसायिक प्रखर भंडारी यांचं लग्न लावून दिलं. त्यांचा हा आदर्श भपकेबाज राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.
Nov 29, 2013, 07:27 PM ISTऊस दराचं गुऱ्हाळही पोहचलं दिल्लीत, उत्तर नाहीच!
ऊस दराच्या मुद्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली.
Nov 26, 2013, 07:51 PM ISTबाबांच्या टोल्यावर पवारांचा प्रतिटोला!
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस निर्मितीचा काय फायदा झाला? या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलंय. वैयक्तिक लाभ सगळ्यात जास्त कुणाला झालाय तर तो पृथ्वीराज चव्हाण यांना झालाय. त्यामुळंच ते मुख्यमंत्री पदावर पोहचल्याचा टोला शरद पवार यांनी लगावलाय.
Nov 10, 2013, 07:07 PM IST‘कॅम्पाकोला’च्या रहिवाशांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
वरळीतल्या कॅम्पाकोला रहिवाशांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. कॅम्पाकोला बिल्डिंगवर मंगळवारी हातोडा पडणार आहे. याआधी शेवटचे प्रयत्न म्हणून रहिवाशांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली.
Nov 9, 2013, 09:31 AM ISTसचिन स्वत:च घेईल निर्णय... - मुख्यमंत्री
निवृत्त झाल्यानंतर राजकारणात शिरून काय काम करायचं? याचा निर्णय सचिनच घेईल, असं सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सचिनतर्फे बॅटींग केलीय.
Oct 22, 2013, 10:28 PM ISTदाभोलकर हत्या : `...तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी मानधन स्वीकारू नये`
नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. यामुळे सामाजिक कार्यकर्ते तसंच सर्वसामान्य जनतेत तीव्र असंतोष आहे. जोवर मारेकऱ्यांचा शोध लागत नाही तोवर मुख्यमंत्र्यांनी मानधन स्विकारू नये, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केलीय.
Oct 20, 2013, 09:27 PM IST…’तो’ फ्लॅट मुख्यमंत्री सरकारला परत करणार
भक्ती पार्कमध्ये मुख्यमंत्र्यांच्या फ्लॅटमध्ये अनधिकृतरित्या भाडेकरू राहात असल्याचं वृत्त ‘डीएनए’ या इंग्रजी वृत्तपत्रासह ‘झी मीडिया’नेही दाखवलं होतं.
Oct 13, 2013, 11:30 PM IST