sugarcane

सततच्या 'कोल्हापूर बंद' मुळे नागरिक त्रस्त

गेल्या महिन्याभरात कोल्हापूरात ४ वेळा शहर बंद पाळण्यात आलाय. १२ डिसेंबरपासून व्यापाऱ्यांनी LBT विरोधात शहरातील व्यवसाय बंद ठेवलाय. कुणीही उठावं आणि शहर बंद करावं अशी अवस्था झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोल्हापूरातली जनता बंदला वैतागलीये.

Dec 17, 2011, 11:04 AM IST

अजित पवारांचा दरेकरांवर पलटवार

ऊस दरवाढीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. ऊस दरवाढीच्या मुद्यावरून अजित पवारांनी मनसेला टीकेचं लक्ष्य केलं. मनसेच्या ताब्यात असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं साखर कारखान्यांना कर्ज द्यावं अशी सुचना अजितदादांनी केली. त्याला मुंबै बँकेचे अध्यक्ष असलेल्या प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं.

Nov 13, 2011, 05:46 AM IST

ऊस दरवाढीचा तिढा सुटणार?

ऊस दरवाढीचा तिढा सुटणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पवारांना मध्यस्थीची विनंती केल्यामुळं पवारांनी मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा केली.

Nov 11, 2011, 03:16 PM IST

अखेर ऊस दराचा तिढा सुटला

अखेर ऊसदराचा तिढा सुटला, कोल्हापूर विभागात 2050 रू. पुणे विभागासाठी 1850 तर उर्वरित महाराष्ट्रासाठी 1800 रू. दर निश्चित करण्यात आला आहे. लेखी पत्र मिळाल्यानंतर उपोषण सोडणार असल्याचं शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी सांगितलं आहे.

Nov 11, 2011, 03:12 PM IST

ऊस शेतकऱ्यांवर 'माये'ची पाखर

महाराष्ट्रात शेतकरी संघटनेने उसाला योग्य दर मिळावा यासाठी तीव्र आंदोलन छेडलं असताना तिकडे उत्तर प्रदेशात मायावती सरकारने उसाच्या दरात २० टक्क्यांनी वाढ केली आहे.

Nov 9, 2011, 11:55 AM IST

ऊसाचे झालं राजकीय चिपाड

शेतकरी आंदोलनांमुळे सहकारक्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण झालेय. तर आत्मक्लेष यात्रा बारामतीत दाखल होत असल्यानं आंदोलनावर तोडगा काढण्याऐवजी काका-पुतण्यांनी शेतकरी संघटनांच्या नेत्यांना टार्गेट करायला सुरुवात केलीय.

Nov 7, 2011, 04:23 AM IST

कारखान्यांसाठी साखरेची चव कडवट

यंदाच्या गळीत हंगामात महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने आर्थिक आरिष्ट कोसळ्याची चिन्हं दिसत आहेत. सहकारी साखर कारखान्यांकडे मागील वर्षीचा ३.५ दशलक्ष टनांचा शिल्लक साठा पडून आहे.

Nov 1, 2011, 04:07 PM IST

तुझ्या उसाला लागला कोल्हा...

सरकारी खात्यांनी वर्तवलेले अंदाज अचूक येणं हा चमत्कार मानला जातो आणि प्रादेशिक साखर संचालनालय त्याला अपवाद कसा असू शकतो. संचालनालयाचा अहवाल आणि लागवडीखालील उसाचे क्षेत्र यात मोठी तफावत आहे.

Oct 25, 2011, 01:37 PM IST