sugarcane

ऊस दरवाढीसाठी कायदा करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

ऊस दरावरून दरवर्षी होणारे आंदोलन लक्षात घेऊन आता ऊस दर ठरवण्यासाठी कायदा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय आहे. यापुढे ऊसाला कारखान्याच्या उत्पन्नाच्या आधारावर दर देण्यात येणार आहे.

Dec 4, 2013, 09:30 PM IST

... आणि अजित पवार माधव भंडारींवर भडकले

शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळं सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघेल अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Dec 1, 2013, 08:33 PM IST

उसाला २६५० रुपये पहिली उचल घ्यायला मान्यता

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी एक पाऊल पाठिमागं घेत २६५० रुपये उसाला पहिली उचल घ्यायला मान्यता दिली असली तरी कोल्हापुरात सकाळपासून ठिकठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं.

Nov 29, 2013, 07:49 PM IST

ऊस आंदोलन पेटले, कराड-चिपळूण मार्ग रोखला

ऊस दरासाठी आंदोलकांनी अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवले गेले आहेत. त्यामुळे दूध संकलनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कराड - चिपळूण रस्त्यावर तांबवे फाट्यावर रास्तारोको करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. कराडबंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

Nov 28, 2013, 11:24 AM IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी `काळी दिवाळी`?

देशात दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आलीय.

Oct 30, 2013, 06:33 PM IST

दुष्काळाने पळवली साखर!

राज्यात पडलेल्या भयाण दुष्काळाचा परिणाम साखर उत्पादनावरही दिसून आलाय. 2012-13 या संपलेल्या गळीत हंगामात साखरेच्या उत्पादनात 10 लाख मेट्रिक टनाने घट झालीय.

May 26, 2013, 07:13 PM IST

राज्यातला दुष्काळ उसाच्या मळ्यांसाठी लागू नाही

राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे, असं असतानाही पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे मळे मात्र फुललेले दिसत आहेत.

Mar 15, 2013, 02:17 PM IST

ऊसाला २५०० रूपये भाव

सांगली जिल्ह्यतील इस्लामपूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांची काल बैठक झाली. यात ऊसाला प्रतिटन २५०० रुपयाचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मान्य केला असून, उसाचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय.

Nov 19, 2012, 03:36 PM IST

ऊस आंदोलन पेटलं, राजू शेट्टी ताब्यात, बस जाळली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना इंदापूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर
दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोणीदेवकर इथं संतप्त शेतक-यांनी बस जाळलीये. दोन ते तीन बसच्या काचा फोडण्यात आल्यात. तर अनेक बस बंद पाडण्यात आल्यात.

Nov 12, 2012, 10:52 AM IST

ऊस दरावरून शेतकरी आक्रमक, `चक्काजाम` आंदोलनाचा इशारा

केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचे बंधू विशाल पाटील यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. उसाचा थकित हप्ता मिळावा आणि यंदा 3000 रुपये उचल देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत.

Nov 11, 2012, 10:53 PM IST

...नाही तर गाठ आमच्याशी आहे- राजू शेट्टी

चालू गळीत हंगामातील उसाला पहिला हप्ता तीन हजार रुपये देऊन मागील हंगामातील थकीत चुकती केल्याशिवाय ऊस तोडू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय.

Oct 28, 2012, 08:06 AM IST

ऊस लागवडीचा अभिनव प्रयोग

पारंपरिक ऊस लागवडीच्या पद्धतीला फाटा देणारा एक अभिनव प्रयोग गोंदिया जिल्ह्यातील शेकऱ्यानं केलाय. या प्रयोगामुळे त्यांचं साधारण ७० ते ७५ टक्क्यांनी उसाच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

Aug 28, 2012, 11:17 AM IST

गाळप होईपर्यंत कारखाने बंद नाही - पाटील

ऊस शेतकऱ्यांचे प्रश्न आजही कायम असल्याने शेतकरी चिंतेत आहे. या शेतकऱ्याला आधार देण्याचा प्रयत्न सरकारने केले आहे. ऊसाचे संपूर्ण गाळप होईपर्यंत कारखाने बंद होणार नाहीत असे आश्वासन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळाला आहे.

Mar 19, 2012, 04:48 PM IST

ऊस कामगार मतदानापासूनच दूरच !

पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणी कामगार पाठीवर संसार घेऊन फिरत असतात. यामुळेच पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी आलेले सुमारे दोन लाख कामगार यावेळी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

Feb 4, 2012, 04:17 PM IST