सोमय्यांनी ठोठावलं पंतप्रधान कार्यालयाचं दार
किरीट सोमय्या यांनी येत्या 3 महिन्यात महाराष्ट्रातील सहा भ्रष्ट मंत्र्यांचा भ्रष्टाचार समोर आणण्याचा दावा केलाय. महाराष्ट्रातील मंत्री सुनील तटकरे यांच्या जमिनीच्या सात बाराचे उतारे किरीट सोमय्यांनी पंतप्रधानाच्या कार्यालयात दिले. इतके पुरावे असूनही का कारवाई होत नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
Jul 11, 2012, 11:14 AM ISTपवार काका-पुतणे तटकरेंचे पाठीराखे!
राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यावर होणा-या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तटकरेंची पाठराखण केली आहे.
Jul 6, 2012, 08:12 PM ISTतटकरेंवर आरोप करणारे पाटील अडचणीत
रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांच्यावरही आरोप होऊ लागलेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यापारी जेट्यांचं बांधकाम केल्याची लेखी तक्रार पाटील यांच्याविरुद्ध पोयनाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Jun 21, 2012, 10:58 AM ISTसुनील तटकरेंना मुख्यमंत्र्यांनी घातले पाठीशी
जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या मुलांच्या नावे ३८ कंपन्या असल्याचा आरोप शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केला होता. तसंच याप्रकरणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही चौकशीची मागणी केली होती.
Jun 7, 2012, 04:04 PM ISTमुख्यमंत्र्यांनी आणलं राष्ट्रवादीला अडचणीत
काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा मंत्री सुनील तटकरे पाटबंधारे विभागाचे सादरीकरण करणार होते, मात्र सादरीकरण नको तर श्वेतपत्रिकेचा मसुदाच मंत्रिमंडळासमोर आणा अशी सूचना करून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला अडचणीत आणलंय.
Jun 7, 2012, 08:41 AM ISTजलसंपदामंत्र्यांच्या मुलांच्या नावे करोडोंची संपदा!
विविध घोटाळ्यांमुळं राज्य सरकार चर्चेत असताना जलसंपदामंत्री सुनील तटकरे त्यांच्या मुलांच्या नावे असलेल्या संपत्तीमुळं चर्चेत आलेत. तटकरे यांच्या दोन मुलांच्या नावे ३८ कंपन्या असल्याचं उघड झालंय.
Jun 6, 2012, 02:47 PM ISTविदर्भ सिंचन महामंडळात ३००० कोटींचा भ्रष्टाचार
विदर्भ सिंचन विकास महामंडळात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. विधानसभेत खडसेंनी हा गौप्यस्फोट केलाय
Apr 2, 2012, 01:50 PM IST