taj mahal

देशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना फ्री वायफाय

देशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना वायफाय सुविधा मिळणार आहे. पहिला अर्धा तास ही सुविधा मोफत देण्यात येईल. त्यानंतर मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागतील. 

Aug 16, 2015, 07:52 PM IST

ताजमहालासमोरच युगुलाचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न

प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताजमहालासमोरच एका प्रेमी जोडप्यानं गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. 

Jul 16, 2015, 05:23 PM IST

'ताजमहाला'त दफन केलीय बेगम मुमताजची 'ममी'!

जगभरात प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखलं जाणारं ताजमहाल हे एक 'ममी महल' असल्याचा दावा एका पुस्तकात करण्यात आलाय. प्रेमाचं प्रतिक समजल्या 'ताजमहाल'मध्ये मुगल बादशाह शाहजहानं याच्या पत्नीचं शव 'ममी'च्या रुपात दफन करण्यात आलंय, असा उल्लेख यात करण्यात आलाय.

Jan 29, 2015, 05:46 PM IST

ताजमहाल परिसरात कोळसा, शेण जाळण्यास मनाई

जगातल्या अप्रतिम वास्तूंपैकी एक अशी ओळख असलेल्या आग्रा इथल्या ताजमहाल परिसरात, गाईचं शेण आणि कोळसा जाळण्याला मनाई करण्यात आलीय.

Jan 13, 2015, 02:56 PM IST

सानिया मिर्झाला ताज महालमध्ये नो एंट्री

आग्राः मंगळवारी संध्याकाळी सानिया मिर्झा ही ताज महल पाहण्यासाठी गेली होती. तेव्हा तिला ताज महालमध्ये जाऊ दिले नाही.

कारण ताज महाल पाहण्याची वेळ संपली होती. तेव्हा महालचे दरवाजे देखील बंद झाले होते. त्यामुळे तिला आत जाण्यास मनाई केली होती.

Oct 8, 2014, 05:42 PM IST

मिस यूनिवर्स २०१२चं ‘ताज महल’वर चुकीचं पाऊल!

मिस यूनिवर्स २०१२ ओलिविया कल्पो हिनं भारताची शान असलेल्या ताज ‘महल’वर चुकीचं पाऊल ठेवलंय. काल भारताच्या पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षण टीमनं मिस यूनिवर्स २०१२ विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय.

Oct 8, 2013, 04:12 PM IST

आता दुबईतही ताज महल

दुबईमध्ये ताज महलची प्रतिकृती ताज अरेबिया बनवण्यात येत आहे. ही प्रतिकृती ताजमहलपेक्षाही भव्य असेल, असा दावा ताज अरेबिया बनवणाऱ्यांनी केला आहे. लिंक ग्लोबल ग्रुप ताज अरेबिया बांधत असून ‘द वर्ल्ड इन अ सिटी’ या नव्या योजनेनुसार फॉल्कनसिटी ऑफ वंडर्सच्या रुपात ताज अरेबिया पहायला मिळणार आहे.

Oct 3, 2012, 04:59 PM IST

'ताजमहल'चं अस्तित्व धोक्यात !

जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य असलेला आणि भारताचा मानबिंदू असलेला 'ताजमहाल' धोक्यात आला आहे. ताजमहालाचा एक मनोरा गेल्या काही वर्षांमध्ये झुकत असल्याचं प्रतिज्ञापत्र पुरातत्व विभागानं सुप्रीम कोर्टात सादर केलं आहे.

Jan 28, 2012, 12:20 AM IST