tourists

कोकणात पर्यटाकांनी समुद्र किनारे ओसंडलेत

बच्चे कंपनीला उन्हाळ्याची सुट्टी लागलीय. त्यातच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सलग चार दिवस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि गोव्यामधील पर्यटनस्थळी मोठी गर्दी होतेय. 

May 2, 2015, 12:57 PM IST

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांचा धुडगूस

खरतर कधी कधी जंगली श्वापदांपेक्षा माणसांचे वागणं हे हिस्त्र असतं आणि याचाच प्रत्यय आला ताडोबाच्या जंगलात. चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात काही हौशी फोटोग्राफर आणि पर्यटकांनी रात्रीच्या वेळी प्रवेश करून धुडगूस घातल्याचा धक्कादायक आणि चीड आणणारा प्रकार समोर आलाय. वन्यजीव अभ्यासकांनी या प्रकारावर चिंता व्यक्त केलीय.  

Mar 20, 2015, 02:57 PM IST

मध्य रेल्वे रोखली : प्रवाशांवर पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेक

कल्याण -ठाणे दरम्यान मध्य रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने संतप्त प्रवाशांनी दिवा स्थानकात रेल्वे रोको केला. यावेळी गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. यावेळी काही प्रवाशांनी गाड्यांवर दगडफेक केली. गेले तीन तास रेल्वे रोखून धरल्याने ठाण्याच्यापुढे लोकल धावलेल्या नाहीत.

Jan 2, 2015, 10:34 AM IST

गोव्यात ख्रिसमसची लगबग, पर्यटकांसाठी हॉटेल्स सज्ज

ख्रिसमस अगदी दोन दिवसांवर आलाय. गोव्य़ात ख्रिसमसची लगबग सुरू आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. तर पर्यटकांसाठी हॉटेल्स सज्ज झालीयेत.

Dec 22, 2014, 07:44 AM IST

पुण्यातल्या 6 पर्यटकांना रत्नागिरीत जलसमाधी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले इथं पुण्यातल्या 6 पर्यटकांना जलसमाधी मिळालीय. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. हे सर्व पर्यटक पुण्याहून कोकणात फिरायला आले होते.

May 25, 2014, 06:06 PM IST

रेल्वेत गुंगीचं औषध देऊन परदेशी पर्यटकांना लुटलं

गुंगीचे औषध देवून परदेशी पर्यटकाचा ९१०० डॉलर किमतीचा ऎवज चोरीस गेल्याची घटना एर्णाकुलम - हजरत निजामुद्दीन मंगला एक्सप्रेसमध्ये घडलाय. मनमाड लोहमार्ग पोलिसांनी याबाबत चोरीचा गुन्हा दाखल केलाय.

Feb 10, 2014, 11:42 PM IST

उत्तराखंडात बर्फवृष्टीची चादर

जिथे पाहावं तिथं बर्फ.. पांढ-या शुभ्र बर्फाची दुलई पांघरून सध्या काश्मिर आणि हिमाचल प्रदेश पहुडलंय. त्यामुळे पर्यटकांसाठी ही एक पर्वणी झालीय. हिवाळ्यातल्या पहिल्या बर्फवृष्टीनं काश्मिर, हिमाचलप्रदेशमध्ये सध्या हे असं नयनमनोहर दृष्य पहायला मिळतंय. डोंगर, झाडं, घरं ज्याठिकाणी नजर टाकाल त्याठिकाणी बर्फच बर्फ... काश्मिरच्या पटनी टॉप, नत्थाटॉप या पर्यटन स्थळांवर सगळीकडे बर्फाचं साम्राज्य पाहायला मिळचंय.

Dec 24, 2013, 06:22 PM IST

गोव्यात ५० रूपयांमध्ये सेक्ससाठी मुलं उपलब्ध ?

गोव्यात धक्कादायक सत्य उघड झाले आहे. गोव्यातील बिचवर ५० रूपयांमध्ये सेक्ससाठी मुलं उपलब्ध होतात, अशा दावा ‘बागा बिच’चे निर्माता प्रमोद साळगावकर यांनी केला आहे.

Nov 27, 2013, 01:11 PM IST

गोव्यात स्थानिक विरुद्ध नायजेरिन्समध्ये `ड्रग्स वॉर`

पर्यटननगरी गोव्यात सध्या स्थानिक आणि नायजेरियन व्यक्तींमध्य़े ड्रग्स वॉर सुरु आहे. गोव्यात पर्यटकांच्या बेकायदेशीर वास्तव्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागल्याचं समोर आलंय.

Nov 11, 2013, 09:19 AM IST

ताडोबाच्या जंगलात`वाघिणीचं दूध`!

चंद्रपूरच्या ताडोबा अभयआरण्याला भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांचे लवकरच इंग्रजीतून स्वागत केले जाणार आहे. ताडोबामध्ये काम करणा-या गाईड्सना सध्या इंग्रजी प्रशिक्षणाचे धडे दिले जातायत.

Sep 23, 2013, 08:14 PM IST