एक्झीट पोल

उत्तर प्रदेश एक्झीट पोलनंतर शेअर मार्केटमध्ये तेजी

उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजप आघाडीवर राहिल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी वर्तवलाय. याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येतोय. याचा सकारात्मक परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीवर दिसून येतोय. आज सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात दिसत आहेत.

Mar 10, 2017, 06:15 PM IST

देशातील राजकीय स्थिती कशी असेल, कोणाला किती जागा?

लोकसभा निवडणूक एकूण नऊ टप्प्यात पार पडली. आता 16 मे या दिवशीच्या निकालांकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत अनेक बॉलिवूडस्टार उतरले आहेत. तर दुसरीकडे नरेंद्र मोदींची हवा केली गेली आहे. काँग्रेसचं काय होणार, आम आदमी पार्टी काय चमत्कार करणार याची चर्चा रंगत आहेत. तर महाराष्ट्रात मनसे खाते खोलणार का, दक्षिणेकडे नवे तेलंगणा राज्य आणि अन्य राज्यांत काय होणार याची उत्सुकता आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममतांना कौल मिळणार की डावे आघाडी घेणार याचीच जोरदार चर्चा आहे. उत्तर प्रदेशकडे सर्वाधिक 80 जागा असल्याने कोणाला किती जागा मिळतात याची उत्सुकता शिगेला आहे.

May 13, 2014, 09:58 AM IST

एक्झिट पोलवर काँग्रेसला नाही विश्वास

एक्झिट पोलच्या माध्यामातून येणारे निष्कर्ष बिनकामाचे असतात, अशा शब्दांत काँग्रेसने हे निष्कर्ष फेटाळून लावले आहेत, तर आलेल्या निष्कर्षामुळे भाजपला पाचपैकी चार राज्यात स्पष्ट बहुमत मिळणार असं दिसत असल्याने काँग्रेस निरुत्साही झाला असल्याची टीका भाजपने केली आहे.

Dec 6, 2013, 10:32 AM IST