संपाचा चौथा दिवस, तोडगा न निघाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाचा चौथा दिवस उजाडला तरी संपावर तोडगा निघत नाही. ऐन दिवाळीत सुरु असलेल्या संपामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दिवाळी सण असल्याने मुंबईतील चाकरमानी दिवाळीसाठी गावाला निघालाय. मात्र एसटी नसल्याने या सगळ्यांनी खासगी गाड्यांची वाट धरली आहे.
Oct 20, 2017, 08:48 AM ISTएसटी संप : राज्यात प्रवाशांचे हाल आणि त्यात प्रवाशांची लूट
संपामुळे एसटीची सेवा पूर्णत: ठप्प आहे. रत्नागिरीत सेवा कोलमडली असून कोल्हापुरात संपामुळे प्रवाशांचे हाल तर होतातच आहेत. त्याशिवाय प्रवाशांची लूटही सुरु झालीय. खासगी बसेसनी अव्वाच्या सव्वा दर आकारायला सुरुवात केलीय. तर अहमदनगर येथे स्कूल बसचा आधार घेण्यात आलाय.
Oct 19, 2017, 03:58 PM ISTएसटी संपामुळे दोन दिवसात ५० कोटींचे नुकसान
एसटीचा संप आज तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. या संपाचा मोठा आर्थिक फटका बसलायाय. संपाच्या दोन दिवसांत एसटीचे ४५ ते ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आता आजपासून एसटीचे कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. तसे संकेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेत.
Oct 19, 2017, 01:13 PM ISTमुंबई । मुंबई सेंट्रलच्या आगारातून एकही एसटी सुटलेली नाही!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 12:42 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा नाही
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत एसटीनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसत आहे. तर दुसऱ्या बाजूला संपामुळे खासगी वाहनचालकांनी तिकिटाचे दर अव्वाच्या सव्वा केल्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय.
Oct 18, 2017, 11:34 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकार तयार - रावते
पगारवाढीसाठी सरकार तयार आहे. हट्ट सोडा. तुम्ही लढा द्या मात्र, ऐन दिवाळीत अन्नदात्याचे हाल करू नका. कामावर परत या, असे अवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.
Oct 18, 2017, 06:13 PM ISTमुुंबई | कुर्ला | नेहरूनगर | एसटी कर्मचारी संपाचा प्रवाशांना फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 05:57 PM ISTमुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकार तयार - दिवाकर रावते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 05:56 PM IST'संप मोडून काढण्यासाठी प्रशासन दडपशाही करतंय'
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी प्रशासन दडपशाही करत आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलभूत सुविधा बंद करून त्यांना विश्रामगृहातून बाहेर काढण्यात येत आहे. हा सुद्धा दडपशाहीचाच एक भाग आहे, असा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला आहे.
Oct 18, 2017, 05:24 PM ISTअन्नदात्यांचे हाल करु नका, कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे - परिवहन मंत्री
एसटी कामगार संघटनेने पुकारलेला संप मागे घ्या असे आवाहन करताना दिवाळीच्या सणात तुमच्या अन्नदात्यांचे हाल करु नका, तुम्ही तात्काळ कामावर रुजू व्हा, अशी साद परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घातली. दरम्यान, संपाला गालबोट लागलेय.
Oct 18, 2017, 04:11 PM ISTएसटी कामगार संघटनेचा संप, कामगार न्यायालयाची संपाला स्थगिती
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेने १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली होती. मात्र, दिवाळीत हा संप होणार असल्याने एस टी महामंडळाने कामगार न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने संपाला स्थगिती दिलेय.
Oct 14, 2017, 03:17 PM ISTएसटीचा २३ एप्रिलपासून बेमुदत संप
एसटी कामगारांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या कामगार संघटनेनं संपाची हाक दिलीय. एसटी कामगार संघटनेने २३ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय आहे. शनिवारी येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात हा निर्णय घेतला.
Mar 17, 2013, 08:49 AM IST