१० लाख गूगल अकाऊंट धोक्यात
जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलच्या १० लाखाहून अधिक अकाऊंट्सवर सुरक्षेच्या बाबतीत धोका निर्माण झाला आहे. अँड्रॉइड मालवेयरचा नवा वर्जन गूलीगन याला जबाबदार आहे. ऑनलाइन सिक्युरिटी कंपनी चेक प्वाइंट सॉफ्टवेयर टेक्नोलॉजीच्या रिपोर्टनुसार गूलीगनने गूगलचे १० लाखाहून अधिक अकाउंट्सची माहिती चोरली आहे. गुगलने याबाबत कडक कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.
Dec 1, 2016, 01:23 PM IST