जुना वर्सोवा पूल

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरचा जुना वर्सोवा पूल आज वाहतूकीसाठी बंद

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरचा जुना वर्सोवा पूल आज वाहतूकीसाठी बंद असणार आहे. सकाळी आठ ते दोन याकाळात पूलावरून दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. टेस्टिंगसाठी हा पूल पाच तास बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन या मार्गावर वाहनं आणण्याचं टाळावं असं आवाहन महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक पोलिसांनी केलं आहे.

Sep 19, 2017, 11:04 AM IST

जुना वर्सोवा पूल पुढचे चार दिवस राहणार पूर्णपणे बंद

अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेला जुना वर्सोवा पूल पुढचे चार दिवस पूर्णपणे बंद असणार आहे.

May 14, 2017, 08:41 AM IST