कोयनेत यशस्वी लेक टॅपिंग
कोयना जलायशयात आज लेकटॅपिंगचा थरार पाहायला मिळाला. केवळ आठ सेकंदात पाण्यातच्या खाली स्फोट घडवून आणण्यात आला. त्यामुळे जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यात अभियंते यशस्वी झाल्याने इतिहासातील हे सोनेरी पान लिहिले गेले आहे.
Apr 25, 2012, 12:31 PM ISTकोयनेत आज लेकटॅपिंगचा थरार
कोयना जलायशयात आज लेकटॅपिंगचा थरार होणार आहे. जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली दोन स्फोट घडवण्यात येणार आहेत. दोन वर्षाचे परिश्रम आणि १० कोटी रुपये खर्च करुन हे लेक टॅपिंग करण्यात येणार आहे. या लेक टॅपिंगमुळे वीज निर्मितीत आहे तेवढीच राहणार असली तरी सिंचनासाठी २०टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली दोन स्फोट घडवण्यात येणार आहेत.
Apr 25, 2012, 11:28 AM ISTकोयनेच्या पाण्याखाली घडवणार स्फोट...
कोयनेच पाणी पुन्हा एकदा उसळी घेणार आहे. होय, चवथ्या टप्प्यातील लेक ट्यापिंगची तयारी पूर्ण झाली. येत्या २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून कोयनेच्या पाण्याखाली स्फोट घडवण्यात येणार आहेत.
Apr 20, 2012, 07:09 AM IST