झी मराठीवर महाएपिसोडमधून रंगणार जल्लोष नात्यांचा
झी मराठीने २०१६ या वर्षात नात्यांचे अनोखे बंध जोडले. नवी नाती जपत रसिकांशी आपली घट्ट नाळ जोडली. या वर्षात नात्यांचे अनेकविध रंग रसिकांनी झी मराठीवर अनुभवले. हे वर्ष संपताना या हळूवार नात्यांचाच रंग अधिक गडद होईल. नव्या नात्यांच्या पुसट रेषा ठळक होतील. नात्यांची ही विविधरंगी उधळण आणि हा अनोखा जल्लोष पाहण्याची संधी रसिकांना मिळेल. नाताळच्या सांताक्लॉजबरोबरच अभूतपूर्व भेटींचा नजराणा तीन लोकप्रिय मालिकांच्या प्रत्येकी एक तासाच्या विशेष भागांमधून येत्या रविवारी २५ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता झी मराठीवर रसिकांना मिळणार आहे.
Dec 22, 2016, 05:17 PM IST