गणेशोत्सव : संभाजीनगर टू मुंबई व्हाया हैदराबाद
गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे भक्तीचा अनोखा उत्सव. आपल्या लाडक्या दैवताच्या भक्तीत भक्त या काळात दंग होतात.
Sep 22, 2012, 07:39 PM ISTमुंबईच्या रस्त्यावरही धर्मांधांचं आव्हान!
मुंबईतल्या रस्त्यांवर पाकिस्तानप्रमाणे धर्मांध मुस्लिम उतरल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसलं. धर्मांध मुस्लिमांनी थेट पत्रकार आणि पोलिसांवरच हल्ला चढवला. आसाम आणि म्यानमारमधल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी हजारो मुस्लिम आझाद मैदानात जमा झाले होते. मात्र त्यांना फक्त निषेधच करायचा होता, असं नव्हतं. त्यांच्या हिंसक कृतीतून ते स्पष्ट झालं.
Aug 13, 2012, 04:02 PM ISTपुन्हा विद्यापीठात जाताना...
संतोष गोरे
शाळा आणि कॉलेजपेक्षाही मला विद्यापीठ जास्त भावलं. कारण मी तिथं प्रेमात पडलो होतो. थांबा, मी इथं कोणताही गौप्यस्फोट करणार नाही. मी प्रेमात पडलो होतो, ते आमच्या विद्यापीठातल्या जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या... तिथली दोन वर्ष, तिथं भेटलेले सहकारी अजूनही माझ्या आठवणीत आणि कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मुलाला शाळेत जाताना पाहून माझीही पुन्हा शिकण्याची ऊर्मी जागृत होत होती. अर्थात शाळेत शिकण्याची नव्हे, तर पुन्हा विद्यापीठात शिकण्याची.
अमरावतीतली पत्रकारिता
संतोष गोरे
20 ऑक्टोबर 2006 ते 4 डिसेंबर 2007 या जवळपास सव्वा वर्षाच्या काळात मी अमरावतीत पत्रकारिता केली. हैदराबादहून माझी इथं रिपोर्टर आणि ब्युरो चीफ या पदावर बदली ( बदली म्हणजे शिक्षा नव्हे ) करण्यात आली. हैदराबादून फिल्डवर येण्यासाठी मोठं लॉबिंग करावं लागायचं, तसंच कोणत्यातरी गटाचा कपाळावर ( कुंकू नव्हे ) शिक्का मारावा लागायचा.
मुंबई राखली, आता महाराष्ट्र जिंका !
शिवसेनेनं अखेर मुंबईत 'जिंकून दाखवलंच'. या शहरावर शिवसेनेच्या वाघाची पकड किती मजबूत आहे, हेच यातून दिसून आलं. शिवसेनाप्रमुखांची जंगी सभा आणि वॉर्डा-वॉर्डात पसरलेलं शिवसैनिकांचं जाळं या ताकदीवर मुंबई महापालिकेवरील भगव्याचा डौल पुन्हा कायम राहिला.
Mar 3, 2012, 07:35 PM ISTशिवसेनाप्रमुख आणि मी !
संतोष गोरे
२६ सप्टेंबर १९९३. स्थळ - मराठवाडा सांस्कृतिक मैदान, संभाजीनगर. याच ठिकाणी माझी शिवसेनाप्रमुखांबरोबर पहिली भेट झाली. अर्थात मैदानातल्या लाखो शिवसैनिकांमधला मी एक. विराट सभेला मार्गदर्शन करताना पहिल्यांदाच बाळासाहेबांना मी पहात होतो.
असे पाहूणे येती...
'पाहूणे' हा शब्दच मनात एक आनंद निर्माण करतो. पाहुणा हा येताना आनंदच घेऊन येत असतो. ( अर्थात इथं हा उल्लेख बोलावलेल्या पाहुण्यांबद्दल आहे. उगीच गैरसमज नको. ) आपल्याकडे पाहूणे येत असतात. तसंच आपणही कधी - कधी कुणाकडे पाहूणे म्हणून जातोच ना. अर्थात आजकाल शहरांमध्ये वनबीएचकेच्या युगात पाहुणा येणार म्हटला तरी धडकी भरते.
Jan 5, 2012, 05:26 PM IST