आमदार हर्षवर्धन जाधवांनी पोलिसांच्या कानशिलात लगावली
शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधवांनी पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना पुढे आलीय. नागपूरात आमदार जाधवांनी शिवसेना पक्षप्रमुखांना भेटायला गेले असता हा प्रताप केल्याचं कळतंय.
Dec 17, 2014, 11:08 PM ISTकोंढाणे धरणाच्या घोटाळ्याप्रकरणी चार अधिकाऱ्यांचं निलंबन
राज्यातल्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी युती सरकारनं कारवाईचा धडाका सुरू केल्याचं चित्र दिसतंय. याची सुरूवात कोंढाणे धरण घोटाळ्यापासून सुरू करण्यात आलीय. कोंढाणे धरणाच्या घोटाळ्याप्रकरणी सिंचन खात्याच्या चार अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नागपुरात ही घोषणा केली.
Dec 17, 2014, 09:18 PM ISTभाजप-शिवसेना सरकार विधान परिषदेत बॅकफूटवर
शिवसेना - भाजप एकत्र आल्याने विधानसभेत सरकार बहुमतात आलंय. पण विधान परिषदेत मात्र सरकार अल्पमतात आहे. त्यातच बहुतेक मंत्री अनुभवी नसल्याने विरोधक सत्ताधारी पक्षावर भारी पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
Dec 11, 2014, 11:12 PM ISTनाराजांवर राज ठाकरे अधिक आक्रमक, नाशिकच्या दौ-याकडे लक्ष
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नाराजांचा पुढचा पेपर सोडवायचाय तो नाशिकमध्ये. राज ठाकरे उद्या नाशिकच्या दौ-यावर जातायत. आता येत्या शनिवारी राज ठाकरे मुंबईच्या नगरसेवकांना घेऊन नाशिकच्या दौ-यावर जाणार आहेत. नाशिकच्या विकासकामांचा हा आढावा दौरा असणार आहे. अर्थात तिथेही नाराजांची फौज तयार आहेच. पण राज ठाकरेंनी सध्या तरी नाराजांबद्दल गेले तर जाऊ देत, असंच धोरण स्वीकारलंय़.
Dec 11, 2014, 10:07 PM ISTअर्थमंत्री मुनगंटीवार यांची तिरुपतीवारी ठेकेदाराच्या खर्चाने
ठेकेदाराच्या खर्चानं अर्थमंत्री मुनगंटीवरांची सहकुटुंब तिरुपतीवारी केल्याचे पुढे आले आहे. मात्र, हा प्रवास खर्च पक्षानचं केल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दावा केलाय.
Dec 10, 2014, 03:48 PM ISTदुष्काळग्रस्तांना १० हजार कोटींची मदत द्या - अजित पवार
दुष्काळग्रस्तांना १० हजार कोटींची मदत देण्यात यावी. तसेच पीक कर्ज, वीज बिल माफ करा. आत्महत्याग्रस्तांच्या विधवांना पेन्शन द्या आदी मागण्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केल्या. दुष्काळाच्या स्थगन प्रस्तावाच्या चर्चे दरम्यान अजित पवारांची विधानसभेत ही मागणी केली.
Dec 10, 2014, 03:21 PM ISTदुष्काळप्रश्नावर विरोधक आक्रमक, विधानसभा तहकूब
सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारला दुष्काळप्रश्नावर विरोधकांनी मंगळवारी चांगलेच धारेवर धरले. काँग्रेस आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत चर्चा करण्याऐवजी आधी दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करा, अशी मागणी केली.
Dec 9, 2014, 11:33 PM ISTदुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध
दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध अजूनही कायमच आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीच्या जलसाठ्यात 8 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिलेत. मात्र त्याविरोधात हायकोर्टात समाधानकारक निर्णय न मिळाल्यानं, प्रवरा सहकारी साखर कारखाना आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे.
Dec 9, 2014, 08:08 PM ISTव्यवस्थापन कोट्यातील प्रवेश पारदर्शक होतील : तावडे
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण विविध महाविद्यालयांतील व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशप्रक्रिया पारदर्शक करण्यात येईल, तसेच प्रवेशप्रक्रिया गुणवत्तेवर आधारित करण्यात विचार असल्याचं, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
Dec 9, 2014, 05:39 PM IST‘नेहरू की मोदी’ आव्हाडांची जॅकेटवरून ‘आयडियाची कल्पना’!
विधीमंडळ अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडायचे असतात, याचाच विसर आमच्या लोकप्रतिनिधींना पडलाय की काय...? आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचंच उदाहरण घ्या... नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी काहीही कारण नसताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवरून नसता वाद ओढवून घेतला.
Dec 9, 2014, 03:52 PM ISTमुंबईला तोडण्याचा डाव हा केवळ खोटा प्रचार - देवेंद्र फडणवीस
मुंबईतील प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवावे यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समिती स्थापना करण्याचा प्रस्ताव म्हणजे हा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप होतो. पण हा आरोप सरासर खोटा असून केवळ अपप्रचार करण्याच्या हेतूनं होतोय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
Dec 9, 2014, 03:23 PM ISTकाँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन कायम- निलंबन समिती
भाजप आणि शिवसेना सत्तेमध्ये सहभागी आल्यानंतर, आता विरोधकदेखील सरकारच्या विरोधात एकवटले आहेत....
Dec 9, 2014, 11:52 AM ISTविरोधामध्येच मुळा, भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडलं
पश्चिम महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातून मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी ८ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं पुन्हा एकदा पाण्याचा वाद पेटलाय. मात्र नगरच्या नेत्यांच्या तीव्र विरोधानंतरही मुळा आणि भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.
Dec 8, 2014, 10:31 PM ISTविधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे?
विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आज घोषित होण्याची शक्यता आहे. कारण विधान परिषदेत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचं संख्याबळ अधिक आहे.
Dec 8, 2014, 11:07 AM ISTफडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आजपासून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनाला आज नागपुरात सुरूवात होत आहे. हिवाळी अधिवेशनात या नव्या सरकारला अनेक मोठ्या मुद्यांचा सामना करावा लागणार आहे.
Dec 8, 2014, 09:12 AM IST