स्क्रिनवर न दिसणारा सेल्फी कॅमेरा; Oppo हायटेक स्मार्टफोन लॉंच करण्याच्या तयारीत

ओप्पो आता स्क्रिनवर न दिसणाऱ्या सेल्फी कॅमेऱ्याचा स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे.

Updated: Aug 5, 2021, 03:08 PM IST
स्क्रिनवर न दिसणारा सेल्फी कॅमेरा; Oppo हायटेक स्मार्टफोन लॉंच करण्याच्या तयारीत title=

नवी दिल्ली : भारतीय स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये मोठा हिस्सा Oppo कंपनीचा आहे. ओप्पो नेहमीच आपल्या नवीन फीचर्समुळे ग्राहकांना भुरळ घालत असते. ओप्पो आता स्क्रिनवर न दिसणाऱ्या सेल्फी कॅमेऱ्याचा स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे.

बदलत्या जमान्यानुसार स्मार्टफोन देखील हायटेक झाले आहेत. पूर्वी 8 मेगापिक्सल कॅमेरा देखील खुप मोठी गोष्ट वाटत होती. आता 200 MP कॅमेरे असलेले फोन बाजारात आले आहेत.  परंतु सध्या बाजारात असलेल्या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा स्क्रिनवर असतो. त्यामुळे तो स्क्रिनची शोभा खराब करतो. अशी ग्राहकांची ओरड असते. ओप्पोने आता याचेही सोल्युशन काढले आहे. ओप्पोने आपल्या अंडर-स्क्रिन कॅमेऱ्याच्या नवीन टेक्नॉलॉजीनुसार डिस्प्लेच्या खाली कॅमेरा ठेवला आहे. त्यामुळे स्क्रिन अखंड दिसते. 
Oppo under-display camera technology

ओप्पोच्या या रिजल्टमध्ये स्क्रिनवर कॅमेरा दिसत नाही. त्यामुळे युजर्सला पूर्ण स्क्रीन वापरण्यासाठी मिळू शकते. कंपनीने एक प्रोटोटाइप फोन समोर आणला आहे. ज्यामध्ये ई रिडर ऍपदेखील सुरू आहे. आणि फोनचा कॅमेरा देखील सुरू आहे. परंतु कॅमेरा दिसत नाहीये. 

या फोटोवरून कळतंय की, फोटोचा प्रकाश किती चांगला आहे. फोटोमध्ये रंग उठून दिसत आहेत. याआधी ही सुविधा ZTE च्या Axon 20 5G मध्ये आहे.

ZTE ने असा फोन लॉंच करून ओप्पोच्या पुढे निघाला आहे.  परंतु कॅमेऱ्याच्या गुणवत्तेच्या बाबतीत ओप्पो जास्त चांगला असल्याचे म्हटले जात आहे.