मुंबई : स्मार्टफोन ही काळाची गरज बनली आहे. ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यात ios किंवा iphone हा लोकांच्या आवडीचा फोन आहे. लोकांना हा फोन वापरायला आवडतं आणि बरेच लोक याच्या नवनवीन आवृत्यांचे आणि वर्जनचे वाट पाहात असतात. नुकतंच Apple WWDC 2022 इव्हेंटमध्ये 6 जून iOS 16 ची ओळख करण्यात आली होती. हा वर्जन किमान सप्टेंबरपर्यंत लोकांसाठी लॉन्च होणार नसला तरीही, तुम्ही iOS 16 बीटा प्रोग्राममध्ये नावनोंदणी केल्यास तुम्हीला ते सर्वात आधी वापरण्यासाठी उपलब्ध होऊ शकते.
लक्षात घ्या की फक्त iPhone 8 सीरीज आणि त्यावरील आणि iPhone 13 पर्यंत iPhone डिव्हाइसेसना हे अपडेट मिळेल.
परंतु हे लक्षात घ्या की, यामध्ये अनेक जोखीम देखील आहे, कारण यामुळे तुमच्या फोनमध्ये समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे iOS 16 बीटा प्रोग्राममध्ये स्वतःचे नाव नोंदवण्यापूर्वी काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. त्या कोणत्या, हे जाणून घेऊ या.
Apple त्यांच्यासाठी iOS बीटा प्रोग्राम ऑफर करते ज्यांना आगामी ऑपरेटिंग सिस्टम सार्वजनिक लॉन्च करण्यापूर्वी वापरून पहायची आहे. तुम्ही यासाठी नावनोंदणी करू शकता जो तुम्हाला तुमच्या iPhone वर iOS 16 लाँच होण्यापूर्वी ते वापरण्याची अनुमती देईल.
परंतु iOS 16 बीटा प्रोग्रामसाठी नावनोंदणी करावी का?
आता प्रश्न हा उभा राहातो की, iOS 16 बीटा प्रोग्रामसाठी नावनोंदणी करावी का? तर बीटा प्रोग्राम्सचा वापर Apple द्वारे त्यांच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टमच्या सार्वजनिक चाचण्या सक्षम करण्यासाठी कोणत्याही डील-ब्रेकिंग बग्स किंवा ग्लिच्स शोधण्यासाठी केला जातो.
त्यामुळे, बीटा प्रोग्राम अनेकदा अस्थिर असतात. ज्यामुळे तुमच्या iPhone वर विविध समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्ही तुमचे iPhone डिव्हाइस तुमचे प्राथमिक डिव्हाइस म्हणून वापरत असल्यास, तुम्हाला अशा प्रोग्रॅममध्ये नावनोंदणी न करण्याचा सल्ला दिला जातो.
iOS च्या बीटा आवृत्त्यांमध्ये कार्यप्रदर्शन समस्या, अॅप समस्या, बॅटरीचा जास्त वापर, अॅप्स नीट काम न करणे इत्यादीसारख्या विविध समस्या वारंवार दिसतात. म्हणजेच, तुम्ही तुमचा iPhone 13, iPhone 12 किंवा इतर कोणताही iPhone अपडेट करत असाल, तर अडचणीसाठी तयार राहा.
यामुळे तुमच्या फोनमध्ये तुम्हाला बग्सचा सामना देखील करावा लागू शकतो. तुम्ही यासाठी तयार असाल, तर आणि तरत पुढे जा आणि iOS 16 बीटा प्रोग्राममध्ये स्वतःचं नाव रजिस्टर करा! अन्यथा, स्थिर iOS 16 अपडेट मिळविण्यासाठी तुम्हाला सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल."