नवी दिल्ली : ऑटो एक्सपोच्या पहिल्या दिवशी देशातील सर्वात मोठ्या टू-व्हीलर कंपनी हिरो मोटोकॉर्प यांनी ३ मॉडल्स सादर केले. यात २ स्कूटर आणि १ बाईक आहे. कंपनीने Duet 125 आणि Maestro Edge 125 या दोन स्कूटर्स लॉन्च केल्या. तर २०० सीसी ची Xpulse बाईक शोकेस केल्या.
Duet 125 आणि Maestro Edge 12 या दोन्ही स्कूटर्स 125cc च्या आहेत. दोन्ही स्कूटरमध्ये i3S इंजिन वापरले आहे. दोन्हीही 8.5 bhp पॉवरच्या आणि 10 Nm चे टार्क देतात. स्मार्ट स्कूटर्समध्ये LED टेलाइलट, analog-digital console, Mobile charging, telescopic forks, alloy wheels या सुविधांचा समावेश केला आहे
कंपनीने नवी बाईक Hero Xpulse शोकेस केली. २०० सीसी रेंजची ही बाईक इम्पल्स बाईकचे अपग्रेड व्हर्जन आहे. हे यंग बाईकर्स आणि अॅडव्हेंचरची आवड असलेल्या लोकांना लक्षात ठेवून तयार करण्यात आल्या आहेत.