close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...या लिंकवर क्लिक केलं तर तुमचं 'फेसबुक' अकाऊंट होईल हॅक

सोशल मीडियाची क्रेझच घातक ठरतेय

Updated: Aug 4, 2018, 01:33 PM IST
...या लिंकवर क्लिक केलं तर तुमचं 'फेसबुक' अकाऊंट होईल हॅक

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : सध्याच्या तरूणाईला क्रेझ आहे ती व्हॉट्सअॅप आणि फेसबुकची... पण ही सोशल मीडियाची क्रेझच त्यांच्यासाठी घातक ठरतेय. फेसबुक... सोशल कनेक्टसाठी उपयुक्त ठरणारं तरूणाईचं आवडतं माध्यम... लॅपटॉप, मोबाईल, टॅब अशा सगळ्या माध्यमातून आपण फेसबुकवर सक्रीय असतो... तेच तुमचं फेसबुक अकाऊंट कुणी हॅक केलं तर? होय... गेल्या काही दिवसांत फेसबुक हॅक होण्याच्या घटना वाढल्यात. तुमचं फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यावरून चक्क पैसे उकळले जात असल्याचे गंभीर प्रकार निदर्शनास आलेत.  

या फसवणुकीची पद्धत साधारण सारखीच असते... तुमचा फोटो कुणीतरी अपलोड केलाय, असं सांगून त्या लिंकवर क्लिक करण्यास तुम्हाला सांगितलं जातं. तुम्ही लिंकवर क्लिक केलं की तुमचं अकाऊंट हॅक झालंच समजा... त्या अकाऊंटवरून तुमच्या फेसबुक मित्रांना मेसेजेस पाठवले जातात... तुम्हाला पैशाची तातडीची गरज आहे. अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करा, असं सांगितलं जातं... तुमचे मित्रही प्रेमापोटी पैसे ट्रान्सफर करतात आणि फसतात... त्यामुळे अशा प्रकारांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी केलंय.

या पद्धतीनं सोशल मीडियाचा गैरवापर करून आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढलेत. पोलीस या ऑनलाइन गैरव्यवहार करणाऱ्यांचा तपास करतायत... पण तुम्हीच कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याची सावधगिरी बाळगलेली उत्तम...