सॅमसंगच्या स्मार्टफोवर बंपर ऑफर, स्वस्तात मिळतायत हे ७ स्मार्टफोन

सणांचा माहौल संपला असला तरी अद्याप मोबाईल कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त ऑफर बाजारात आणत आहेत. सॅमसंगने दिवाळीनंतर सॅमसंग कार्निव्हल सुरु केलाय. यात सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोनवर मोठी सूट आहे. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Oct 27, 2017, 11:53 AM IST
सॅमसंगच्या स्मार्टफोवर बंपर ऑफर, स्वस्तात मिळतायत हे ७ स्मार्टफोन title=

मुंबई : सणांचा माहौल संपला असला तरी अद्याप मोबाईल कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त ऑफर बाजारात आणत आहेत. सॅमसंगने दिवाळीनंतर सॅमसंग कार्निव्हल सुरु केलाय. यात सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोनवर मोठी सूट आहे. 

दक्षिण कोरियाची निर्मिती असलेल्या मोबाईल कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर ३० ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या सेलमध्ये अनेक मोबाईल फोन स्वस्तात विक्री करणार असल्याची घोषणा केलीये.याशिवाय ई-कॉमर्स वेबसाईटवरुन मोबाईल खरेदी करताना आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवरुन पेमेंट केल्यास तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळू शकतो. 

Galaxy On5
कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर या स्मार्टफोनची किंमत ७,४९० रुपये आहे. कार्निव्हलमध्ये या स्मार्टफोन ८०० रुपयांची सूट मिळत असून ६,६९० रुपयांमध्ये हा स्मार्टफोन विकला जातोय. यात ८ मेगापिक्सल रेयर आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. 

Galaxy On7

साधारण ७,९९० रुपयांना मिळणारा हा स्मार्टफोन कंपनीकडून ६,९९० रुपयांना विकला जातोय. या स्मार्टफोनवर १००० रुपयांचा डिस्काऊंट दिला जातोय. ५.५ इंचाचा डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये १.५ जीबी रॅम आहे. 

Galaxy On5 Pro
सॅमसंगच्या आणखी एका बजेट स्मार्टफोन सॅमसंग गॅलॅक्सी ऑन ५ प्रोवर ५०० रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. या फोनची बाजारात किंमत ७,४९० रुपये इतकी आहे. मात्र वेबसाईटवर तुम्हाला हा स्मार्टफोन केवळ ६,९९० रुपयांना मिळत आहे. 

Galaxy J3 Pro
गॅलॅक्सी जे ३ प्रो हा स्मार्टफोन तुम्ही या कार्निव्हलमद्ये ७,५९० रुपयांना खरेदी करु शकता. कंपनीकडून या स्मार्टफोनवर ४०० रुपयांचा डिस्काऊंट दिला जातोय. १.५ गिगाहर्टझ क्वाडकोर प्रोसेसर असलेल्या या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा डिस्प्ले आणि २ जीबी रॅम आहे. 

Galaxy On7 Pro
बाजारात ८,९९० रुपयांना मिळणाऱ्या सॅमसंग गॅलॅक्सी ऑन ७ प्रो वेबसाईटवर ८,१९० रुपयांना मिळतोय. यात ५ इंचाचा डिस्प्ले आणि २ जीबी रॅम देण्यात आलाय. 

Galaxy On Nxt 64GB
सॅमसंग गॅलॅक्सी ऑन नेक्स ६४ जीबी हा स्मार्टफोन या ऑफर अंतर्गत १४,९०० रुपयांना विकला जातोय. बाजारात या हँडसेटची किंमत १५,९०० रुपये आहे. यात ५.५ इंचाचा डिस्प्ले, ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. 

Galaxy On Max
सॅमसंग गॅलॅक्सी ऑन मॅक्स हा स्मार्टफोन वेबसाईटवर १५,९०० रुपयांना मिळतोय. या स्मार्टफोनर १००० रुपयांचा डिस्काउंट दिला जातोय. 

Galaxy S8
सॅमसंग गॅलॅक्सी एस ८ या स्मार्टफोनची किंमत ५७,९०० रुपये आहे. मात्र या ऑफरअंतर्गत ५३,९०० रुपयांमध्ये हा फोन उपलब्ध आहे.