ही एक आयडिया तुम्हाला बनवेल करोडपती

सोनी वाहिनीवरील कौन बनेगा करोडपती हा शो सध्या प्रसिद्ध शोपैकी एक आहे. टीआरपीमध्येही हा शो अव्वल आहे. करोडपती होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. या शोद्वारे लोक करोडपती होण्याचा मार्ग शोधतात. अनेकजण त्यात यशस्वीही होतात. मात्र आम्ही तुम्हाला आज अशा काही ट्रिक सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्हीही केबीसीमध्ये न जाता कोट्यावधी रुपये मिळवू शकता. जगात अशा अनेक स्पर्धा भरवल्या जातात ज्याच्या मदतीने लोक कोट्यावधी रुपये मिळवू शकतात. 

Updated: Oct 27, 2017, 09:57 AM IST
ही एक आयडिया तुम्हाला बनवेल करोडपती title=

नवी दिल्ली : सोनी वाहिनीवरील कौन बनेगा करोडपती हा शो सध्या प्रसिद्ध शोपैकी एक आहे. टीआरपीमध्येही हा शो अव्वल आहे. करोडपती होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. या शोद्वारे लोक करोडपती होण्याचा मार्ग शोधतात. अनेकजण त्यात यशस्वीही होतात. मात्र आम्ही तुम्हाला आज अशा काही ट्रिक सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्हीही केबीसीमध्ये न जाता कोट्यावधी रुपये मिळवू शकता. जगात अशा अनेक स्पर्धा भरवल्या जातात ज्याच्या मदतीने लोक कोट्यावधी रुपये मिळवू शकतात. 

स्पर्धा जिंका, करोडपती व्हा
दरवर्षी नव्या आयडिया, नव्या शोधांसाठी कोटी रुपयांचे बक्षिसे असलेल्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. अनेक कंपन्या तसेच श्रीमंत लोक अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करत असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन आहे. आम्ही अशाच काही स्पर्धांबद्दल माहिती देत आहोत ज्यात सहभागी होऊन तुम्ही करोडो रुपये कमवू शकता. या ५ स्पर्धांपैकी २ स्पर्धांची डेडलाईन संपलीये तर इतर ३ स्पर्धांना कोणतीही डेडलाईन नाहीये.

आयडिया द्या आणि मिळवा ११ कोटी रुपये

एक्सप्राईज या संस्थेने एप्रिल-ऑगस्टदरम्यान एका स्पर्धेचे आयोजन केले होते ज्यात विजेत्याला १७.५ लाख डॉलर म्हणजे तब्बल ११.३४ कोटी रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. हवेच्या मदतीने शुद्ध पाणी मिळवण्याची स्पर्धा होती. मात्र यासाठी एक अट ठेवण्यात आली होती. दररोज २ हजार लीटर पाणी शुद्ध केले गेले पाहिजे अशी यासाठी अट ठेवण्यात आली होती. तसेच यासाठी लागणारा खर्च प्रति लीटर २ रुपयांपेक्षाही कमी असावा. 

स्पर्धेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महिला सुरक्षेबाबतची आयडिया सुचवा आणि ६ कोटींचे बक्षिस मिळवा

महिला सुरक्षा एक्स प्राईजमध्ये जिंकणाऱ्या विजेत्याला ६ कोटींचे बक्षिस ठेवण्यात आले. महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणारी यंत्रणा असे या स्पर्धेचे स्वरुप होते. महिला जर धोक्यात असतील तर पुढील ९० सेकंदात या बाबतची माहिती संबंधित लोकांना मिळाली पाहिजे आणि याचा खर्च २५००हून अधिक असता कामा नये अशा अटी होत्या.

गणितातील या प्रश्नांची उत्तरे द्या आणि मिळवा ६.५० कोटी रुपये

क्ले मॅथेमॅटिक इन्स्टिट्यूटने गणिताचे प्रश्न सोडवणाऱ्यांना १० लाख डॉलर म्हणजे ६.४८ कोटी रुपयांचे बक्षिस ठेवले होते. इन्स्टिट्यूटने सात प्रश्न ठेवले होते. यात प्रत्येक योग्य उत्तराला १० लाख डॉलरचे बक्षिस देण्यात येणार आहेत. द रिचेस्टनुसार या प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्यांना ६.४८ कोटी रुपयांचे बक्षिस दिले जाणार होते. या प्रश्नांबाबतची माहिती क्ले मॅथेमॅटिक इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर देण्यात आलीये.

भूत असल्याचे सिद्ध करा आणि ५० लाखांचे बक्षिस मिळवा

ऑस्ट्रलियन स्केप्टिक्स मॅगॅझिनने पॅरानॉर्मल अॅबिलिटीबाबत एक स्पर्धा ठेवली होती. ज्यात टेलपॅथी, एक्स्ट्रॉ सेंसर पॉवर या गोष्टी सिद्ध करणाऱ्यांना ७५ लाख डॉलर अर्थात ५० लाखांचे बक्षिस दिले जाणार आहे. मॅगझिनच्या स्पेशल फीचर सेक्शनमध्ये याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आलीये.

सोने शोधा आणि बक्षिस जिंका

लेखक आणि आर्ट डीलर फॉरेस्ट फेन यांनी अनोखी स्पर्धा ठेवली आहे जी अनेक वर्षांपासून सुरु आहे. १९८८मध्ये त्यांनी सोने आणि दागिन्यांनी भरलेली एक पेटी एका ठिकाणी लपवून ठेवलीये आणि त्यासाठी काही क्लूही दिलेत. २०१६मध्ये फेन म्हणाले या क्लूच्या सहाय्याने सहा कोटी रुपयांचे सोने असलेल्या त्या बॉक्सपर्यंत जाता येते. ही स्पर्धा सुरु आहे. जो या पेटीला शोधेल त्याला हे बक्षिस मिळेल.