BSNLचा जिओला दे धक्का, लॉन्च केले दमदार डेटा प्लान

...

Updated: Jun 20, 2018, 11:02 AM IST
BSNLचा जिओला दे धक्का, लॉन्च केले दमदार डेटा प्लान title=
File Photo

मुंबई : बीएसएनएल (BSNL)च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक दमदार ऑफर आणली आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने प्रीपेड स्पेशल टेरिफ वाऊचर अपग्रेड करत पुन्हा लॉन्च केला आहे. 155 रुपयांच्या प्लानमध्ये बदल केल्यामुळे आता युजर्सला 2GB प्रति दिवस इंटरनेट डेटा मिळणार आहे. यासोबतच Rs. 14, Rs. 29, Rs. 40, Rs. 57, Rs. 68, Rs. 78, Rs. 82, Rs. 85, Rs. 198 आणि Rs. 241 रुपयांचे प्लानही अपग्रेड केले आहेत ज्यामुळे ग्राहकांना अधिक डेटा मिळणार आहे.

BSNL ने नुकतेच आपले प्रीपेड पॅक अपग्रेड केले आहेत. अपग्रेड केलेल्या प्लानमध्ये ग्राहकांना आता 2GB प्रति दिन डेटा मिळणार आहे जो यापूर्वी 1GB आणि 1.5GB मिळत होता. यासोबतच ईद आणि फिफा वर्ल्ड कप स्पेशल प्लानही लॉन्च केले होते.

टेलीकॉम टॉक च्या रिपोर्टनुसार, 14 रुपयांच्या प्लानमध्ये प्रति दिन 110 mb डेटा मिळत होता जो आता 1GB मिळणार आहे. 39 रुपयांच्या आणि 56 रुपयांच्या प्लानची वैधता वाढवून क्रमश: 5 दिवस आणि 21 दिवस करण्यात आली आहे.
68 एक प्लान आहे ज्यामध्ये युजर्सला 2GB डेटा मिळणार आहे जो यापूर्वी 1GB मिळत होता. तर, या प्लानची वैधता 5 दिवसांची असणार आहे. 

78 रुपये आणि 82 रुपयांच्या प्लानमध्ये आता 4GB डेटा मिळणार आहे जो आतापर्यंत 2GB मिळत होता. तर, 241 रुपयांच्या प्लानमध्ये 7GB डेटा 30 दिवसांच्या वैधतेसह असणार आहे. यापूर्वी या प्लानमध्ये 2.7 GB डेटा मिळत होता.