How to Protect Car Stereo: पार्किंगमधील महागड्या गाड्यांच्या (Luxury Cars) काचा फोडून, दरवाज्याचं लॉक तोडून आतील वस्तूंची चोरी झाल्याच्या अनेक घटना आपण पाहतो. महागड्या गाड्या आणि त्यातील वस्तू चोरीला जावू नयेत यासाठी अनेक लोक कुलपाचा वापर करतात.
अशा स्थितीत कुलूप तोडून चोरी करण्याच्या नादात चोरटे संपूर्ण गाडीचं नुकसान करतात. नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे. घराबाहेर उभी असलेली Hyundai Creta गाडीचे काचा फोडून कारमधील टचस्क्रीन सिस्टिम चोरीला गेल्याची घटना घडली आहे. हा Hyundai Creta चा SX प्रकार असून 10.25 इंचचा टचस्क्रीन डिस्प्ले होता.
जर तुमची कारही घराबाहेर किंवा असुरक्षित ठिकाणी उभी असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. येथे आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही अशा चोरीपासून स्वत: ला बचावू शकता.
अशाप्रकारे गाडीचे संरक्षण करा
1. सर्वप्रथम, तुमचे वाहन नेहमी लॉक करा. कारण कार अनलॉक असेल तर त्यांना चोरी करायला खूप सोपे जाऊ शकते.
2. तुमचे वाहन नेहमी उजडेच्या ठिकाणी पार्क करा. अंधारात चोरांचे काम अगदी सोपे होते. तसेच कार उघड्यावर किंवा रस्त्यावर पार्क करण्यापेक्षा घराच्या बाउंड्री वॉल किंवा बहुमजली पार्किंगमध्ये पार्क करणे चांगले.
3. कारमध्ये आफ्टर मार्केट अलार्म सिस्टम बसवता येते. तसेच कारमध्ये कोणतीही मौल्यवान वस्तू ठेवू नका.
4. नेहमी तुमच्या वाहनाची फर्स्ट पार्टी किंवा झिरो डेप इन्शुरन्स ठेवा. एक विमा ज्यामध्ये वाहनाचे भाग देखील समावेश असेल.
5. कार उभी असताना कारला खिडक्या आणि विंडस्क्रीनवर शेड्सही बसवता येतात. जर चोराला काहीही दिसत नसेल, तर चोरीचा धोका नाही.