Cheapest Car : तुमच्या बजेटला धक्का न लावता खरेदी करा ‘या’ कार, जबरदस्त मायलेजसह मिळवा अफलातून फिचर्स

Budget Cars : हक्काची कार असावी, वाटेत तेव्हा वाटेल तिथे आणि वाटेल त्या वेळी निघून जावं अशीच तुमचीही इच्छा आहे? मग वाट कसली पाहताय? बजेटची चिंता आता करुच नका. कारण कार खरेदीचं बेस्ट डील तुमची वाट पाहतंय म्हणे...

सायली पाटील | Updated: Apr 16, 2023, 08:57 AM IST
Cheapest Car : तुमच्या बजेटला धक्का न लावता खरेदी करा ‘या’ कार, जबरदस्त मायलेजसह मिळवा अफलातून फिचर्स  title=
Cheapest Car in india under 5 lakhs latest auto news

Cheapest Car In India : प्रत्येजकण जेव्हा Saving सुरु करतं तेव्हा त्यामागे काही हेतू, काही स्वप्न असतात. घर, स्वत:चं वाहन, जमीन आणि बरंच काही असतं त्या स्वप्नांमध्ये. अनेकजण ही स्वप्न साकार करतात. पण, मध्यमवर्गीयांमध्ये एक स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आर्थिक पाठबळाअभावी दुसऱ्या स्वप्नाला मन नसतानाही बगल दिली जाते. सहसा वाहन खरेदीचंच हे स्वप्न असतं. पण, असं करण्याची आता गरज नाही. आजचा रविवार मार्गी लावणारी ही बातमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणणार आहे. कारण, हक्काचं वाहन खरेदी करण्याची संधीही तुम्हाला मिळणार आहे आणि यासाठी तुमच्या बजेटलाही धक्का लागणार नाहीये.

रविवारच्या सुट्टीच्या दिवशी घरात विचार करत बसण्यापेक्षा ही माहिती वाचा, कुटुंबीयांशी चर्चा करा आणि वाहन खरेदीचं पाऊल उचलाच. किंबहुना तुम्ही घरातल्या मंडळींना हे छानसं सरप्राईजही देऊ शकता. कसं? पाहा...

1 एप्रिलपासून देशात काही कारचे मॉडेल्स बंद झाले आहेत. यामध्ये ऑल्टो 800, रेनॉ क्विड 800 सीसीचा समावेश आहे. असं असलं तरीही याव्यतिरिक्तही काही कार तुमच्यासाठी उपलब्ध आहेत हे विसरु नका. थोडक्यात 5 लाख रुपयांत तुम्ही कार खरेदी करूच शकता. यातील काही पर्याय खालीलप्रमाणं....

Renault Kwid

या कारमध्ये तुम्हाला 1.0 लीटर तीन सिलेंडर असणारं NA पेट्रोल इंजिन मिळतं. ज्यामधून 68 PS आणि 91 Nm पॉवर जनरेट होते. तुमचा विश्वास बसणार नाही, पण 4.70 लाख ते 6.33 लाख रुपयांच्या घरात तुम्ही ही कार खरेदी करु शकता.

Maruti Suzuki S-Presso

एक्स शोरूम किंमत 4.25 लाख रुपये इतकी किंमत असणाऱ्या मारुती सुझूकी एसप्रेसो ही कारही तुमच्या बजेटमध्येच बसेल. डिजिटल स्पीडोमीटर, स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी, टचस्क्रीन इंफोटेन्मेंट असे अनेक फिचर्स तुम्हाला या कारमध्ये मिळणार आहेत. त्याशिवाय सुरक्षिततेसाठी कारमध्ये रिअर पार्किंग सेन्सर, ड्युअल फ्रंट एअरबॅग, स्पीड अलर्ट, ईबीडी, फ्रंट सीटबेल्ट रिमाइंडर असे फिचर्सही दिले आहेत.

Maruti Suzuki Alto K10

मारुतीनं ऑल्टो 800 चं मॉडेल बंद केलं असलं तरीही सध्या त्यांनी ऑल्टो के 10 ही कार सर्वाधिक स्वस्त कार ठरत आहेत. भारतीय ग्राहकांकडून आणि विशेष म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबांकडून या कारला पसंती दिली जात आहे. 3.99 लाख रुपये ते 5.95 लाख रुपये या दरात तुम्ही ही कार खरेदी करू शकता. यामध्ये इंफोटेन्मेंट सिस्टम, Android Auto, Apple Carplay, किलेस एंट्री, हॅचबॅक स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल असे फिचर्स मिळतात.

हेसुद्धा वाचा :Petrol Diesel Price : आज भटकंतीचा मूड? वाहनांचा Tank Full करण्याआधी पाहा पेट्रोल- डिझेलचे दर

सध्यातरी हे तीन पर्याय तुमच्या बजेटला साजेशे असून कारचं स्वप्न सहजपणे साकार करणारे आहेत. मग.... तुम्ही कोणती कार खरेदी करताय?