आपल्या आपण रिपेअर होणार मोबाईलचा तुटलेला ग्लास?

आता स्क्रीनला तडे गेले तर चिंता करण्याची गरज नाही. आता स्क्रीन बदलण्याचं एक सोपं तंत्रज्ञान आलं आहे.

Updated: Jul 24, 2021, 08:13 PM IST
आपल्या आपण रिपेअर होणार मोबाईलचा तुटलेला ग्लास?

मुंबई: आपल्या फोनची स्क्रीन किंवा ग्लास तुटणं म्हणजे काहीतरी आपल्या आयुष्यात मोठी दुर्घटना घडण्यासारखं आहे. मोबाईल हा आपल्या आयुष्य़ातील अविभाज्य भाग आहे. त्याच्या बाबतीत काही चुकीचं घडलं की आपला जीव कासावीस होतो. आपल्या मोबाईलची स्क्रीन तुटली की ती बदलणं फार महाग पडतं. त्यामध्ये अजून पैसे टाकले तर नवीन फोनच येईल असं वाटतं. 

मात्र आता स्क्रीनला तडे गेले तर चिंता करण्याची गरज नाही. आता स्क्रीन बदलण्याचं एक सोपं तंत्रज्ञान आलं आहे. त्यामुळे आता लवकर ही स्क्रीन बदलून मिळणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खडगपूर आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च कोलकाताच्या संशोधकांच्या पथकाने नुकताच एक लेख प्रकाशित केला. 

या लेखात त्यांनी सेल्फ हीलिंग क्रिस्टलाइन मॅटेरियल पद्धतीचा उल्लेख केला आहे. ही पद्धत स्वत:वर उपचार करण्यासारखी आहे.  म्हणजेच या ग्लासमध्ये एक असं तंत्र डेव्हलप करण्यात येणार आहे ज्याचा वापर तो स्वत:ला पुन्हा दुरुस्त करू शकेल. अशी पद्धत तयार करणं हे तज्ज्ञांसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. 

सेल्फ हीलिंग हा प्रयोग कसा केला?
सुईच्या आकाराच्या क्रिस्टल्सपासून तयार केलेला ग्लास प्रयोग करताना वापरण्यात आला. हा ग्लास साधारण 2 मिमी लांब आणि 0.2 मिमी रूंद होता. यापैकी बरेच स्क्रीटल त्यांच्या पृष्ठभागावर शक्तिशाली आकर्षक शक्तींच्या मदतीने एकमेकांशी जोडण्यात आले होते. शास्त्रज्ञ म्हणतात की ही संकल्पना नवीन नाही.

स्व-उपचार तंत्रज्ञानाचा मोठा फायदा म्हणजे त्याची शक्ती. हे सामान्य सामग्रीपेक्षा 10 पट कठीण आहे. हे तंत्रज्ञान विकसित करण्याची प्रयत्न सुरू आहेत. मात्र ते बाजारात कधी उपलब्ध होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.