मोबाईल चार्जिंगला लावल्यास रिकामं होईल Bank Account; चुकूनही करु नका 'ही' चूक

Cyber Frauds In India: विशेष म्हणजे ही नव्या पद्धतीची फसवणूक करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा कॉल, लिंक, मेसेज किंवा ओटीपी येत नाही. बरं पैसे गेल्याचं खातेदराला समजतंही नाही.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 15, 2023, 04:36 PM IST
मोबाईल चार्जिंगला लावल्यास रिकामं होईल Bank Account; चुकूनही करु नका 'ही' चूक title=
हा असा प्रकार यापूर्वी तुम्ही कधी ऐकला किंवा वाचला नसेल

Cyber Frauds In India: सायबर गुन्हेगारीचे रोज नवे नवे प्रकार समोर येत आहेत. अनेकांना या आधुनिक गुन्हेगारीबद्दल, आपण फसवले जातोय याबद्दल अनेकांना पुसटशी कल्पनाही नसते. अनेकदा हे ऑनलाइन स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधत असतात. असाच एक नवीन प्रकार सध्या समोर आला असून ही फसवणूक फारच वेगळ्या प्रकारची आणि गोंधळात टाकणारी आहे. कोणाच्या लक्षातही येणार नाही अशापद्धतीने हे सायबर गुन्हेगार एखाद्याच्या बँक खात्यावरुन सर्व पैसे काढून घेऊ शकतो. बरं हे पैसे गेल्याचं खातेदराला समजतंही नाही. नेमका हा प्रकार आहे का समजून घेऊयात...

कॉल, लिंक, मेसेज किंवा ओटीपी नाही

सायबर चोरांनी शोधून काढलेल्या या फसवणुकीच्या पद्धतीला ज्यूस जॅकिंग असं म्हणतात. याचा वापर करुन हॅकर्स आणि सायबर चोरटे एखाद्याच्या आयुष्यभराची कमाई काही वेळात लुटून नेतात. विशेष म्हणजे ही नव्या पद्धतीची फसवणूक करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा कॉल, लिंक, मेसेज किंवा ओटीपी येत नाही. आतापर्यंत मोबाईल वापरकर्त्याकडून काहीतरी चूक घडवून त्याच्या माध्यमातून लुटणाऱ्या हॅकर्सने याहून पुढे जात केवळ चार्जिंगच्या आधारावर चोऱ्या सुरु केल्या आहेत.

नेमकं होतं काय?

ज्यूस जॅकिंगसाठी खोटे मोबाईल चार्जिंग स्टेशन्स उभारले जातात. स्कॅमर्सने तयार केलेल्या या मोबाईल चार्जिंग स्टेशनमधील चार्जिंग पॉइण्ट्सवर मोबाईल चार्जिंगसाठी लावल्यास मोठा फटका बसू शकतो. मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर या माध्यमातून स्कॅमर्स युझर्सच्या बँकिंग डेटाबरोबरच बराच संवेदनशील डेटा चोरतात. या माध्यमातून चोरलेल्या डेटामधून सायबर गुन्हेगार त्या मोबाईलमधील बँकिंग अॅप्स आणि मेसेजमधील माहितीही मिळवतात. त्यानंतर ते बँकेच्या खात्यावर लॉगइन करुन त्या खात्यातील सर्व रक्कम आपल्या खात्यावर वळवून घेतात. या साऱ्या गोष्टी घडताना युझर्सला आपल्या खात्यावरुन पैसे वळवले जात असल्याचं समजतही नाही. कारण पैसे काढल्याचे मेसेज नोटिफिकेशन आले तरी ते मेसेज हे हॅकर्स डिलीट करतात.

कुठे असतात हे चार्जिंग स्टेशन

स्कॅमर्सकडून हे असे खोटे चार्जिंग सेंटर सार्वजनिक ठिकाणी कुठेही असू शकतात. चार्जिंग स्टेशन, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, विमानतळ, मॉल, सिनेमा हॉल अशा कोणत्याही ठिकाणी हे खोटे चार्जिंग सेंटर असू शकतात. त्यामुळे मोबाईल चार्ज करताना सावध राहण्याची गरज आहे.

हे एवढं केलं तर होईल फायदा

अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन कमीशनने दिलेल्या सल्ल्यानुसार ज्यूस जॅकिंगपासून सावध राहण्यासाठी काही सुरक्षेसंदर्भातील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही मोबाईल चार्जिंग सेंटवर मोबाईल चार्ज करताना पॉपअप नोटिपिकेशनमध्ये काही पर्याय दिसतात. ज्यामध्ये शेअर डेटा, ट्र्स्ट दिस कंप्युटर आणि चार्ज ओन्ली असे पर्याय दिसतात. यामधील चार्ज ओन्ली पर्याय निवडवा. असं केल्यास मोबाईलमधील डेटा शेअर होत नाही.