सायबर हल्ल्यापासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी 'स्मार्ट टीप्स'

स्मार्टफोन आणि कॉम्प्यूटरचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. पर्यायाने इंटरनेटचा वापर अतिप्रचंड प्रमाणात वाढला. मात्र, त्याचसोबत सायबर हल्ल्याचाही धोका चोरपावलांनी केव्हा येऊन ठेपला हे कळलेच नाही. प्रौढ व्यक्तींपेक्षा हा धोका लहान मुलांना सर्वाधिक प्रमाणात आहे. त्यामुळे लहान मुलांना सायबर हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी वापरा या 'स्मार्ट टीप्स'.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 14, 2017, 11:45 PM IST
सायबर हल्ल्यापासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी 'स्मार्ट टीप्स' title=

मुंबई : स्मार्टफोन आणि कॉम्प्यूटरचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. पर्यायाने इंटरनेटचा वापर अतिप्रचंड प्रमाणात वाढला. मात्र, त्याचसोबत सायबर हल्ल्याचाही धोका चोरपावलांनी केव्हा येऊन ठेपला हे कळलेच नाही. प्रौढ व्यक्तींपेक्षा हा धोका लहान मुलांना सर्वाधिक प्रमाणात आहे. त्यामुळे लहान मुलांना सायबर हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी वापरा या 'स्मार्ट टीप्स'.

मुलांशी संपर्कात : नियमितपणे मुलांशी संवाद साधा. ते ऑनलाईन असताना काय करता येईल याची माहिती द्या. त्यांच्याशी संभाषण करा. रोजच्या घडामोडी किंवा शाळेतील माहिती यांवर चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधा.

पासवर्ड नियंत्रीत करा : मुलांमध्ये आत्मविश्‍वास आणि विश्‍वास वाढवा. जेणेकरून मुले कोणत्याही मोहाला धाकधपटशहाला बळी न पडता इंटरनेटचा आपला कोणताही पासवर्ड ईतरांना शेअर करणार नाहीत. मग ते मित्र असोत किंवा इतर कोणी.

अ‍ॅक्सेस मिळवा : मुलांच्या सोशल मिडिया अकाऊंट्सचे पासवर्ड्स आणि पासकोड्स मिळवा. परिणामी तुम्ही तुमच्या मुलांच्या इंटरनेट आणि गॅझेट्स वापरावर नियंत्रण मिळवू शकाल.

तुमचे तंत्रज्ञानातील ज्ञान अद्ययावत करा: मुलांना उपकरण देण्याआधी त्या उपकरणाची संपूर्ण माहिती मिळवा. त्यांतील अधुनिक सोयी सुविधा आणि सोशल नेटवर्क्स विषयीची माहिती अद्ययावत ठेवा. जरी तुम्हाला अकाऊंट बनवण्याची गरज नसली तरीही समजणे गरजेचे आहे. की तुमचीमुले जे नेटवर्क वापरतात ते कसे चालते.

मुलांच्या बोलण्याकडे लक्ष द्या: आपल्या मुलाच्या बोलण्यात कोणते शब्द येतात. मित्रांशी बोलताना ते कोणत्या सांकेतीक भाषेचा वापर करतात का ते पहा.

मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवा: मुलांचे वर्तन नेहमीसारखेच आहे का, याकडे बारकायीने लक्ष द्या बऱ्याचदा वर्तनावरून मुलांच्या मानसीकतेचा आंदाज बांधता येतो.

दिवसेंदिवस तंत्रज्ञान खुपच प्रगत होत चालले आहे. त्यामुळे येणारी पिढी ही स्मार्टच असणार. त्याला अपणास थोपवता येणार नाही. काळाचा विचार करता ते योग्यही नाही. म्हणूनच पालकांनी सतर्क रहायला हवे.