Jio चं 5G आलं रे! प्रीपेड सिमकार्डच्या होम डिलीवरीसाठी ही प्रोसेस फॉलो करा

तुम्ही Jio वापरकर्ते असाल आणि 5G सेवांचा आनंद घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Updated: Sep 11, 2022, 02:19 PM IST
Jio चं 5G आलं रे! प्रीपेड सिमकार्डच्या होम डिलीवरीसाठी ही प्रोसेस फॉलो करा title=

Jio 5G India: भारतात 5G नेटवर्कचं पर्व सुरु झालं आहे. त्यामुळे 5G नेटवर्कबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जिओनं दिवाळीपर्यंत 5G सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत लाँच केली जाईल, अशी घोषणा केली आहे. त्याचबरोबर डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण देशात सुविधा मिळेल, असंही सांगितलं आहे. कंपनीने 5G नेटवर्कसाठी 2 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. जर तुम्ही Jio वापरकर्ते असाल आणि 5G सेवांचा आनंद घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही Jio 5G सिम घरपोच मिळवू शकता. कसं ते जाणून घ्या. 

जर तुम्ही जिओ वापरकर्ते असाल आणि तुम्हाला घरी बसून Jio 5G सिम कार्ड हवे असेल तर एक अतिशय सोपी प्रक्रिया फॉलो करावी लागेल. सर्वप्रथम Reliance Jio च्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि नंतर तिथे दिलेल्या 'Get Jio SIM' पर्यायावर क्लिक करा. आता तुमचे नाव आणि तुमचा फोन नंबर नोंदवा आणि त्यानंतर दिलेल्या फॉर्मचा तपशील अचूक भरा. फॉर्म भरल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. आता, तुम्हाला विचारले जाईल की तुम्हाला प्रीपेड सिम कार्ड मिळवायचे आहे की तुम्ही पोस्टपेड निवडा.

सर्व तपशील भरल्यानंतर  तुम्हाला वेबसाइटवर विचारले जाईल की तुम्हाला सिम कार्ड कोणत्या पत्त्यावर वितरित करायचे आहे. तुमचा पत्ता टाका आणि लक्षात ठेवा की तो तुमच्या आधार कार्डचा पत्ता असावा. यानंतर तुम्हाला घरपोच सिमकार्ड सहज मिळेल. अशा प्रकारे, अगदी सोप्या पद्धतीने, तुम्ही 5G सिमची डिलिव्हरी घरबसल्या मिळवू शकता.