नवी दिल्ली : दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकजण नव-नवे कपडे किंवा वस्तू खरेदी करत असतात. तुम्हीही खरेदी करण्याच्या विचारात आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
नव्या वस्तू किंवा कपडे खरेदी करणं प्रत्येकालाच आवडतं आणि त्यात जर डिस्काऊंट मिळाला तर मग मज्जाच. डिस्काऊंटचा फायदा घेत प्रत्येकजण आपल्या परिवारासाठी चांगली शॉपिंग करतात.
यंदाच्या दिवाळीत तुमची शॉपिंग आणखीनच स्वस्त होणार आहे. कारण, ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या विविध ऑफर्ससोबत सूटही देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे तुम्ही दिवाळीपूर्वी खरेदीचा आनंद घेऊ शकता.
ग्राहकांना आकर्षित करणयासाठी ई-कॉमर्स कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक्सपासून कपड्यांपर्यंत सर्वच वस्तूंवर मोठी सूट देण्यासाठी कंपन्यांसोबत बोलणी केली आहे. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, पेटीएम आणि स्नॅपडीलसारख्या कंपन्यांसोबतच इतरही ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांनी यासाठी तयारी केली आहे.
ई-रिटेल कंपनी फ्लिपकार्टने दरवर्षीप्रमाणे यंदाही बिग बिलियन डेज नावाने यंदाही मोठ्या सेलचं आयोजन केलं आहे. हा सेल २० ते २४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये विविध कंपन्यांच्या वस्तूंवर तब्बल ९० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार असल्याचं बोललं जात आहे.