फेसबुकवरून असा करा मोबाईल रिचार्ज

या फिचरच्या मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करू शकता.

Updated: Apr 20, 2018, 08:03 PM IST
फेसबुकवरून असा करा मोबाईल रिचार्ज  title=
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप  पेमेंटनंतर फेसबुकने गुपचुप एक नवं फिचर सुरू केलयं. या फिचरच्या मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करू शकता. हे फिचर केवळ अॅण्डॉईडवर उपलब्ध आहे. कंपनी लवकरच हे फिचर आयफोन आणि डेक्सटॉपवर उपलब्ध आहे. याच्या मदतीने प्रिपेड मोबाईल युजर्स आपला मोबाईल रिचार्ज करु शकतात. पण अजूनही सर्वांना हे फिचर उपलब्ध झालेल नाही.

असा करा मोबाईल रिचार्ज 

सर्वात आधी स्क्रिनवर दिसणाऱ्या उभ्या रेषांवर क्लिक करा 
 
'मोबाईल टॉप अप' नावाच ऑप्शन दिसेल.त्यावर क्लिक करा 
 
तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ऑपरेटर निवडा.
 
रिचार्ज रक्कम टाका. आपल्याला हवे असलेले प्लान शोधा. 
 
रिव्यू ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स टाका.
 
प्लेस ऑर्डरवर क्लिक करा. फओनवर ओटीपी येईल. त्यानंतर फोन रिचार्ज होईल. 
 
प्लानबद्दल माहित नसेल तर ब्राऊज प्लानमध्ये जाऊन प्लान निवडा.
 
आपला ऑपरेटरही हे एप स्वत:हून निवडत. तुम्हाला हव असल्यास ऑपरेटर बदलू शकता. 

प्रायव्हसी कायम राखणार

केम्ब्रीज अॅनालिटिका स्कॅंडलनंतर युजर्सची प्रायव्हसी कायम राखण्यासाठी फेसबुने आता नवे पाऊल उचलले आहे. फेसबुकने युरोपमध्ये आपल्या युजर्सना नवी प्रायव्हसी सादर केली आहे. जी जनरल डेटा प्रोटेक्शन विनिमय (जीं.डी.पी.आर.)चा घटक आहे. आणि ही सेवा येत्या २५ मेपासून सुरू होणार आहे. 

सखोल अभ्यास करून फेसबुकने उचलले पाऊल

ही नवी प्रणाली लागू करण्यासाठी फेसबुकने नव्या टीमसोबत अतिषय सखोल अभ्यास केला आहे. ज्यात शेकडो कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जर तुम्हाला वेबसाईट आणि अॅपबाबत आपल्याला जाहिरातीसंबंधीत डेटासंबंधी प्रश्न आला तर, फेसबुक लोकांना सांगेन की हा मजकूर जाहिरात पुरस्कृत आहे. याबाबत आपण विचार करून निर्णय घ्या. आपण आमच्या भागिदाराकडून दाखवल्या जाणाऱ्या माहितीचा वापर करू इच्छिता किंवा नाही. 

ब्लॉगद्वारे दिली माहिती

जर आपल्या प्रोफाईलवर राजकीय, धार्मिक आणि इतर संबंधांबाबत माहिती देण्याबाबत काही पोस्ट कराल तर, फेसबुक आपल्याला विचारेल आपण शेअर केलेली माहिती आपण कायम ठेऊ इच्छिता काय? फेसबुकचे उपाध्यक्ष आणि मुख्य गोपनीयता अधिकारी एरिन इगन यांनी एका ब्लॉगद्वारे ही माहिती दिली.