जबरदस्त लूकसह 125 सीसी FB Mondial Piega बाइक लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

एफबी मोंडिअल या बाइक निर्मात्या कंपनीने नवी 125 सीसी असलेली पीगा बाइक लाँच केली आहे.

Updated: Jun 3, 2022, 01:50 PM IST
जबरदस्त लूकसह 125 सीसी FB Mondial Piega बाइक लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या title=

एफबी मोंडिअल या बाइक निर्मात्या कंपनीने नवी 125 सीसी असलेली पीगा बाइक लाँच केली आहे. या बाइकबाबत बाइकप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पीगा 125 स्पर्धा केटीएम 125 ड्यूक आणि यामाह एमटी-15 या बाइकसोबत असणार आहे. पीगा एफबी मोंडिअलमधील सर्वात महागड्या स्पोर्ट्स बाइकपासून प्रेरित आहे, ज्याला होंडा V-Twin SP1 प्रमाणेच इंजिन मिळते. या बाइकचे बाह्य भाग प्रसिद्ध डिझायनर रोडॉल्फो फ्रेस्कोली यांनी डिझाइन केले आहेत. 

लहान आकाराचे इंजिन
नवीन पीगा 125 मध्ये 124 सीसी सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. जे 14.8 Bhp पॉवर आणि 10.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे. तुलनेत, केटीएम 125 Duke मध्ये बसवलेले इंजिन 14.5 bhp पॉवर आणि 12 Nm पीक टॉर्क पॉवर जनरेट करते. तथापि, एफबी मोंडिअल पीगा 125 चे एकूण वजन 135 किलो आहे. केटीएम 125 ड्यूकपेक्षा वजनाने खूपच हलकी आहे. अशा परिस्थितीत ही बाइक अधिक वेगाने पळणं अपेक्षित आहे.

बाइकचे फीचर्स आणि किंमत
पीगा 125 फीचर्स आणि स्पेअर्स लिस्टमध्ये समोरील बाजूस नॉन-एडजस्टेबल यूएसडी फोर्क्स, मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन यांचा समावेश आहे. बाइकच्या दोन्ही चाकांमध्ये सिंगल-चॅनल एबीएससह डिस्क ब्रेकही देण्यात आले आहेत. नवीन बाईकची किंमत 4,400 युरो (3.66 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. कंपनी भारतात नवीन पीगा 125 लॉन्च करेल की नाही, याबाबत अजून साशंकता आहे.