फ्लिपकार्ट बंपर सेल : ऑफर, ४० हजारांचा मोबाईल १५ हजार रुपयांत

फ्लिपकार्टच्या चार दिवसीय सेलची सुरुवात झाली आहे.अनेक उत्पादनांवर मोठी सूट देण्यात येत आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 20, 2017, 03:39 PM IST
फ्लिपकार्ट बंपर सेल : ऑफर, ४० हजारांचा मोबाईल १५ हजार रुपयांत title=

मुंबई : फ्लिपकार्टच्या चार दिवसीय सेलची सुरुवात झाली आहे. अनेक उत्पादनांवर मोठी सूट देण्यात येत आहे. गॅझेट, वेशभूषा, वस्त्र आणि मोबाईल यांच्यावर बंपर  ऑफर देण्यात आलेय. तर ऑनलाईन खरेदी करताना  ४०,००० रुपयांचा जबरदस्त स्मार्टफोन १५,००० रुपयांत तुम्हाला खरेदी करता येणार आहे.

या 'बिग बिलीयन सेल' मध्ये, ह्यूवाई पी ९ स्मार्टफोनवर चक्क २५ हजार रुपयांची सूट मिळत आहे. या स्मार्टफोनची वास्तविक किंमत ३९,९९९ रुपये आहे.  ऑनलाईन सेलमध्ये १४,९९९ रुपयांना हा फोन मिळत आहे.

ह्यूवाई पी ९ थ्री जीबी रॅम असून ५.२ इंच स्क्रीन  असून  IPS-NEO LCD पूर्ण एचडी आहे. या स्मार्टफोनमध्ये 1.8 जीएचझेड ओक्टा-कोर प्रोसेसर आणि १२ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे. मायक्रो एसडीद्वारे या स्मार्टफोनची मेमरी वाढविली जाऊ शकते. ती २५६ जीबीपर्यंत.

कंपनीने २०१६  मध्ये हा स्मार्टफोन ३२ जीबी अंतर्गत मेमरीसह सादर केला होता. हा फोन Android Marshmallow v6.0 वर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सेलचा रियर आणि ८ मेगापिक्सेल फोटो कॅमेरा आहे. यात ३००० एमएएच बॅटरी आहे.

या व्यतिरिक्त, या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. या बंपर सेलमध्ये दूरदर्शन, एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिनसारख्या अनेक ग्राहक वस्तूंवर ७०% सूट आहे.

फॅशन आणि कपडे उत्पादनांबद्दल मोठा सेल आहे. ५०० पेक्षा अधिक ब्रॅण्डचे कपडे उपलब्ध आहेत. यामध्ये पेप, लुईस, यूसीबी सारख्या अनेक ब्रॅण्डचा समावेश आहे.

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये, मोबाईलबरोबर बॅग्ज, बेडशीट्स आदींवर ४०% पर्यंत तर  टायमक्सच्या ५० टक्क्यांपर्यंत सवलत मिळत आहे.