भारतात Google Pay च्या व्यवसायावर ठपका ; CCI ने दिले चौकशीचे आदेश

अडचणीत वाढ होण्याची शक्यता 

Updated: Nov 10, 2020, 10:01 AM IST
भारतात Google Pay च्या व्यवसायावर ठपका ; CCI ने दिले चौकशीचे आदेश

मुंबई : डिजिटल पेमेंट ऍप गुगल पे (Google Pay) च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (CCI) ने Google Pay च्या कथितरित्या अयोग्य व्यवसाय पद्धतीवर ठपका ठेवला आहे. CCI ने इंटरनेट क्षेत्रातील महत्वपूर्ण कंपनी गूगलच्या विरोधात तपासाचे आदेश दिले आहे. 

गुगल एक लोकप्रिय डिजिटल वॉलेट आहे. CCI ने आपल्या पान क्रमांक ३९ वर म्हटलं आहे की,''कंपनीने कायद्याच्या कलम ४ मधील विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याचं आयोगाचं प्राथमिक मत आहे.'' CCI ने आपल्या महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहे. Google Pay च्या कथितरित्या अयोग्य व्यवसाय पद्धतीवर ठपका ठेवला आहे. कंपनीने कायद्याच्या कलम ४ मधील विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याचं आयोगाचं CCI ने सांगितलं आहे. 

'या' ५ कंपन्यांविरोधात चौकशीचे आदेश 

सीसीआयनं अल्फाबेट इंक, गुगल एलएलसी, गुगुल आयर्लंड लिमिटेड, गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. “गुगल सध्या जे काही करत आहे ते अयोग्य आहे आणि त्यांनी भेदभाव करणाऱ्या अटी शर्थी ठेवल्या आहेत. याअंतर्गत, गुगल पेच्या स्पर्धक अ‍ॅप्सना बाजारात प्रवेश प्रदान केला जात नाही, असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे,” असं सीसीआयनं सांगितलं.