Chat GPT : टेक्नॉलॉजी म्हटलं की त्यात कोणतीच गोष्टी ही आधीसारखी राहत नाही. त्यात सतत काहीना काही बदल होत राहतात आणि काही नवीन पाहायला मिळतं. गुगलच्या बाबतीतही तेच पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून चॅट जीपीटीची (Chat GPT) सर्वत्र चर्चा सुरु आहे. सर्च इंजिन म्हटले की सगळ्यांना गुगलची आठवण येते. मात्र, चॅट जीपीटीबद्दल असे म्हटले जाते की भविष्यात गुगलला याचा मोठा फटका बसू शकतो. दरम्यान, त्यात एक अडचण अशी आहे की तंत्र हिंदू धर्माविरोधात मोठा कट रचला जात असल्याचे म्हटले जात आहे. चॅट जीपीटीच्या मदतीनं इंटरनेटच्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हिंदू देवी-देवतांची खिल्ली उडवली जात आहे. (Joke On Hinduism)
चॅट जीपीटी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणारे तंत्रज्ञान आहे.हे एक डीप मशीन लर्निंग बॉट आहे. म्हणजेच तो तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो आणि प्रत्येक प्रश्नानंतर शिकतो. टेकच्या जगात याची सर्वत्र चर्चा आहे. GPT म्हणजे जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर (Generative Pre-Trained Transformer). याचा अर्थ तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा एक रोबोट असे त्याला म्हटले जाते. दरम्यान, चॅट जीपीट माहिती ऐवजी हिंदू देवदेवतांवर विचारलेल्या उत्तरावर जोक सांगत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता मोठा वाद सुरु झाला आहे.
DNA च्या रिपोर्टनुसार, चॅट GPT धर्मावर असलेल्या काही ठरावीक प्रश्नावर Chat GPT आक्षेपार्ह उत्तर देत आहे. महत्त्वाचं म्हणजे हिंदू धर्माशी संबंधीत असलेल्या प्रश्नांवर अपमानास्पद उत्तर देत आहे. श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि रामायणसारख्या धर्मग्रंथांवर आणि भगवान बुद्धांवर विनोद सांगत आहे. तर, चॅट जीपीटी त्याला बायबल, येशू, कुराण किंवा इतर धर्मांवरील विनोद विचारता कोणताही धार्मिक भावना दुखावणाऱ्या प्रश्नांवर विनोद सांगत नाही. हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीनं या सॉफ्टवेअरचे कोडिंग करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. कारण जेव्हा इस्लाम धर्मावर विनोद विचारला तर त्यावर विनोद न सांगता उत्तर दिले की, 'मला माफ करा, पण धार्मिक व्यक्तिमत्त्वावर विनोद सांगणे चुकीचे आहे. सर्व धर्मांच्या श्रद्धांचा आदर करणे गरजेचे आहे. मी तुम्हाला आणखी काही मदत करू शकतो का?'
हेही वाचा : Google चा विस्तार, थेट नवी मुंबईला पसंती; महिन्याचे भाडे कोट्यवधीच्या घरात
मात्र, हिंदू धार्मिक ग्रंथ रामायणावर एक विनोद सांगत चॅट जीपीटीनं शेवटी सांगितलं की 'रामायण हा हिंदू धर्माचा धार्मिक ग्रंथ आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे त्याचा आदर करणे आवश्यक आहे. सायबर कायद्याच्या तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की जर एआयने (AI) कोणत्याही धर्माविरुद्ध भेदभावपूर्ण वृत्त स्वीकारले असेल आणि त्यात हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन असेल तर हे पहिल्यांदाचा घडलेले नाही. पुढच्याकाळात असे होण्याची शक्यता आहे. भारतात यावर कडक कायदे करण्याची गरज आहे, म्हणजेच यावर कारवाई करता येईल.