मुंबई : होंडा कार्स इंडीया लिमिटेड (HCIL)ने आपली नवी अमेझ कारची प्री बुकींग सुरू केली आहे. नवी अमेझ कार मे महिन्यात लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे. याची डिलरशीप २१ हजार रुपयांत केली जात आहे. नवीन अमेज ऑल न्यू प्लेटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही वेरिएंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे.होंडा डिझेल इंजिनची पहिली सीव्हीटी (ऑटोमेटिक ट्रांसमिशन) असलेली कार आहे. ही टेक्नोलॉजी भारतात पहिल्यांदा लॉन्च होत आहे. कंपनीचे सिनियर वाईस प्रेसिडेंट आणि डिरेक्टर राजेश गोयल यांनी सांगितले की, अमेझ कंपनीच्या सर्वात सफल मॉडेलपैकी एक आहे. देशात अमेझचे २.५७ लाखांहुन अधिक संतुष्ट ग्राहक आहेत.
नव्या अमेझला होंडा ऑटो एक्सपो २०१८ (Auto Expo 2018) मध्ये सादर करण्यात आले आहे. नव्या कारला कंपनीने स्टायलिश लूक दिला आहे. याचे फिचर्स दमदार आहेत. जुन्या मॉडल्सच्या तुलनेत नव्या जनरेशन अमेझचे डिझाईन्स आणि फिचर्समध्ये खूप बदल करण्यात आले आहेत. ऑटो एक्सपोमध्ये कंपनीने CRV आणि सिव्हीक कारचे नवे मॉडल सादर केले आहेत.
नव्या होंडा अमेझच्या वेरिएंटवर १० स्पोक एलॉय व्हिल्स दिले जाण्याची आशा आहे. यात टोन इंटिरियर आहे. लेगरुम वाढवण्यात आली आहे. त्यामुळे कारमधून लांबचा प्रवास करणे आरामदायी असेल.नवी बोल्ड डिजाईन, सुंदर इंटिरिअर, उत्तम पावरट्रेन, राईड परफॉर्मन्स आणि शानदार ड्रायव्हींग यांसारख्या सुविधा आहेत. ४ मीटरचे कॉम्पॅक्ट साईज बोनेट, एरो dyanamic स्लीक सेडानच्या आकारात आहे. होंडा अमेझ १.२ लीटर V-TEC पेट्रोल आणि 1.5 लीटर D-TEC चे इंजिन आहे. यात ऑटोमेटीक गीयर बॉक्स आहे. पेट्रोल इंजिनची पावर 88hp आहे तर डिझेल इंजिनची पावर 100hp इतकी आहे.
नव्या लूकची होंडा अमेझ मारुती डिझायरला टक्कर देईल. डिझायर पेट्रोल इंजिनसोबत २२ किलोमीटर प्रती लीटर मायलेज देते आणि डिझेल इंजिनसोबत ही कार २८.४ किलोमीटर प्रती लीटर मायलेज देते. डिझायरची सुरुवातची किंमत ५.४५ लाक आणि ९.४१ लाख रुपये आहे.