या कारणामुळे Honda ने परत मागवल्या मिनी वॅन

काय आहे ही समस्या 

या कारणामुळे Honda ने परत मागवल्या मिनी वॅन  title=

मुंबई : होंडाने जगभरातील 1,22,0000 मिनी वॅन गाड्या पुन्हा मागवल्या आहेत. या गाड्याची अशी तक्रार होती की, गाडी चालता चालता या गाडीचे स्लायडिंग दरवाजे आपोआप उघडतात. कंपनीने 2018 आणि 2019 ची Odyssey वॅनला पुन्हा बोलावलं आहे. 

होंडाने सांगितलं की, यामध्ये पावर डोअरची समस्या आहे. हे दरवाजे आपोआप उघडत आहेत. आतापर्यंत या समस्येमुळे कोणत्याही दुर्घटनेची माहिती हाती आलेली नाही. कंपनीचे डीलर ही समस्या लवकरच दूर करणार आहेत. होंडाला विश्वास आहे की, डिसेंबरपर्यंत ही समस्या दूर होईल. 

कंपनीने सांगितलं की, जोपर्यंत डीलरला या समस्येवर उपाय करणार किट मिळत नाही तोपर्यंत कार मालकांकडे पावर स्लायडिंग दरवाजा उघडण्याचा दुसरा पर्याय असेल. व्यक्तिगत रुपाने दरवाजा उघडण्याचा आणि बंद होण्याचं काम होणार आहे.