जबरदस्त लूक, होंडा शाईनची नवी कोरी दुचाकी नवे इंजिन आणि अपडेटसह

होंडा कंपनीने भारतात होंडा शाईनची नवी कोरी दुचाकी नव्या इंजिन आणि अपडेटसह बाजारात आणली आहे.  

Updated: Feb 25, 2020, 08:40 PM IST
जबरदस्त लूक, होंडा शाईनची नवी कोरी दुचाकी नवे इंजिन आणि अपडेटसह  title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : होंडा कंपनीने भारतात होंडा शाईनची नवी कोरी दुचाकी नव्या इंजिन आणि अपडेटसह बाजारात उतरविली आहे.  यात बीएस-६ इंजिनसह ५-स्पीड ट्रान्समिशन आणि फ्युअल-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. या दुचाकीची दिल्लीत एक्स-शोरूम किंमत ६७,८५७ रुपये  आहे. होंडा शाईन आणि होंडा एसपी १२५  मध्ये एकसारखे इंजिन आहे. होंडा शाईन भारतात सर्वाधिक विक्री होणारी १२५ सीसी दुचाकी आहे. 

या दुचाकीत ब्रेकिंग सुविधा खास असून, रिबेल रेड मेटॅलिक, जेनी ग्रे मेटॅलिक, ऑथेंटिक ब्लू मेटॅलिक आणि ब्लॅक या चार रंगात ही दुचाकी उपलब्ध आहे. बाईक उत्पादक कंपनी ‘होंडा’ने आपली सर्वाधिक खपाची ‘सीबी शाईन’ ही बाईक अपडेटेड बीएस ६ इंजिनसह लाँच केली आहे. हे नवीन इंजिन ७५०० आरपीएमवर १०.७२ बीएचपीची ऊर्जा आणि ६,००० आरपीएमवर  १०.९ बीएचपी पीक टॉर्क निर्माण करते.

याशिवाय नव्या इंजिनमध्ये सायलेंट स्टार्टरसोबत एनहान्स्ड स्मार्ट पॉवर देण्यात आली आहे. नव्या इंजिनमुळे बाईकची इंधन कार्यक्षमता  १४ टक्क्मयांनी वाढली आहे. तसेच या बाईकच्या मागे लो-रेजिस्टन्स ट्युबलेस टायर आहेत. ड्रम आणि डिस्क अशा दोन व्हेरिअंट्समध्ये ही बाईक उपलब्ध असेल. 

दरम्यान, याआधी टीव्हीएसने आपल्या नव्या बाईक्सचे दोन नवीन मॉडेल लॉन्च केले आहेत.  आपल्या जुन्या बाईक मॉडेल्सशी तुलना केली तर सर्वात प्रथम  आपली नजर जाईल ती हेडलॅम्पवर. टीव्हीएसच्या डिझाईनिंग टीमने त्याच्या आकर्षकतेसाठी प्रयत्न केले आहेत. या दोन्ही बाईक्समध्ये १२ लीटरची इंधन टाकी आहे. त्याच्या खाली छान अशी कट लाईन डिझाईन केली आहे. त्याचबरोबर इंजिनाच्या खाली असलेलं मडगार्डही बाईकचा बोल्ड लूक नजरेत भरणारा आहे. या बाईक्समध्ये बीएस - ६ इंजिन बसवलं आहे. यावरुन या बाईक्सचं महत्व लक्षात येते. तसेच ५ स्पीड गिअरसह स्लिपर क्लच या बाईकमध्ये आहे.