मुंबई : वाढती स्पर्धा आणि बदलत्या टेक्नोलॉजीच्या जगात टिकून राहण्यासाठी ट्विटर नियमित काही बदल करत असते.
नुकतेच ट्विटरने ट्विट लिहण्यासाठी असणारी कॅरेक्टर लिमिट वाढवली होती. आता त्यापाठोपाठ ट्विट बुकमार्क करण्याची सोय आणली आहे.
ट्विटरने आयओएस, अॅन्ड्रॉईड, ट्विटर लाईट आणि मोबाईल.ट्विटर .कॉम यावर ट्विट बुकमार्क करण्याची सोय खुली केली आहे. ही जगभरातील 300 मिलियन युजर्सना खुली करण्यात आली आहे.
ऑक्टोबर 2017 साली ट्विटरने बुकमार्किंगसाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती दिली होती.
ट्विट बुकामार्क करण्यासाठी शेअर बटणवर क्लिक करा
त्यानंतर तुम्हांला अॅड टू बुकमार्कचा ऑप्शन दिसेल
Found something historic?
Don’t want to forget a joke?
Article that you want to read later?Save the Tweet with Bookmarks, and come back to it whenever you want. Only you can see your Bookmarks. pic.twitter.com/fM2QLcOYNF
— Twitter (@Twitter) February 28, 2018
प्रोफाईल फोटोवर क्लिक करा
त्यानंतर बुकमार्क केलेले सारे ट्विट्स Bookmarks या पर्यायमध्ये पाहता येणार आहेत.