आयडिया देणार १० जीबी ४ जी डाटा मोफत

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इंटरनेट डेटाच्या स्पर्धेत आता आयडियानेही उडी घेतली आहे. देशातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आयडियाने मुंबई क्षेत्रात आपली ४ जी सेवा सुरु केली आहे. आपल्या ग्राहकांना आयडिया १० जीबी ४ जी डाटा मोफत देणार आहे. ही ऑफर नव्या ग्राहकांसाठी पहिल्या तीन महिन्यांसाठी असणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 26, 2017, 05:07 PM IST
आयडिया देणार १० जीबी ४ जी डाटा मोफत title=

मुंबई : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इंटरनेट डेटाच्या स्पर्धेत आता आयडियानेही उडी घेतली आहे. देशातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आयडियाने मुंबई क्षेत्रात आपली ४ जी सेवा सुरु केली आहे. आपल्या ग्राहकांना आयडिया १० जीबी ४ जी डाटा मोफत देणार आहे. ही ऑफर नव्या ग्राहकांसाठी पहिल्या तीन महिन्यांसाठी असणार आहे.

आयडियाचे मुंबई सर्कलमध्ये ४४ लाख ग्राहक आहेत. बिर्ला समूहाचे आदित्य बिर्ला यांनी २० सर्कलमध्ये ४ जी सेवा सुरु केली आहे. ब्रिटनची कंपनी व्होडाफोन आयडियात विलीन होत आहे. त्यानंतर दोन्ही कंपन्या एकत्र आल्यानंतर दूरसंचार बाजार आणखी आकर्षक ऑफर आणणार आहेत.

रिलायन्स जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी आयडीया ४जी सेवा सुरु केलेय आणि नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पहिले तीन महिने १० जीबी ४जी डाटा देणार आहे.

आयडियाला २०१६-२०१७ या वर्षात चौथ्या तिमाहीत ३२७.७ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. हा तोटा सतत दुसऱ्या तिमाहीत झाला. या तिमाहीत कंपनीचा व्यवसाय १३.७ टक्के घटून ८,१९४.५ कोटी रुपयावर राहिला आहे.

 रिलायन्स जिओ, व्होडाफोन आणि एअरटेलनंतर आता आयडिया सेल्युलरनेही आपल्या ग्राहकांसाठी एक वर्षापर्यंत मोफत ४जी डेटाचा स्पेशल प्लॅन लॉन्च करत आहे. मोफत ४जी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि SMS देणारा टेरिफ प्लॅन बुधवारी आयडियाने लॉन्च केलाय. याआधी एअरटेल, व्होडाफोनसारख्या टेलिकॉम कंपन्यांनीही टेरिफ प्लॅनची ऑफर लॉन्च केली होती.

या नव्या प्लॅनमार्फत ४जी चा प्रसार वाढेल आणि आयडियाच्या ग्राहकांना हाय-स्पीड वायरलेस ब्रॉडबँड सर्व्हिसेस घेण्यासाठी प्रोत्साहनही मिळेल, असा दावा कंपनीतर्फे करण्यात  आलाय.