Gmail वरील हजारो ईमेल्सला तुम्ही कंटाळले आहात? ही Trick वापरा आणि तुमचे अकाउंट लगेच साफ करा

अशाप्रकारच्या मेल्समुळे केवळ महत्त्वाचे ईमेल शोधणे कठीण होत नाही, तर यामुळे...

Updated: Jul 28, 2021, 05:04 PM IST
 Gmail वरील हजारो ईमेल्सला तुम्ही कंटाळले आहात? ही Trick वापरा आणि तुमचे अकाउंट लगेच साफ करा title=

मुंबई : आपल्या जीमेल इनबॉक्समध्ये शेकडो मॅसेजेस असेच पडलेले असतात जे आपण वाचत देखील नाही, त्याचबरोबर आपल्याला काही मेल असे येताता जे आपल्या कामाचे नसतात त्यामुळे आपल्यासाठी हे मॅसेज नकोसे असतात. परंतु त्यांना एक एक करुन किंवा प्रत्येक मॅसेजला क्लिक करुन डिलीट करण्यासाठी खूप वेळ वाया जातो. त्यामुळे आपणे ते करणे थांबवतो परंतु आपल्या अकाउंटमध्ये खूप कचरा जमा होतो, जो आपल्याला नकोसा वाटतो. परंतु स्वच्छ आणि साफ इनबॉक्स ठेवणे एक कठीण काम आहे.

अशाप्रकारच्या एकत्रित मेल्समुळे केवळ महत्त्वाचे ईमेल शोधणे कठीण होत नाही, तर यामुळे मोबाईल जीमेल अ‍ॅप खूप स्लो चालू लागतो. त्यात तुम्हाला मेल डिलीट करायचे झाले, तर एकवेळी फक्त 100 मेलच तुम्हाला सिलेक्ट करुन डिलीट करता येते. त्यामध्ये तुम्हाला पाहिजे असणाऱ्या आणि नको असणाऱ्या मेलला सिलेक्ट करावे लागेल.

तुम्हाला जीमेल इनबॉक्समधील ईमेल मोठ्या प्रमाणात हटवण्याची युक्ती आहे. फक्त यासाठी मर्यादा अशी आहे की, ही युक्ती केवळ वेब-आधारित जीमेलवर कार्य करते. तर चला जाणून घेऊया की, कसं काम करते.

आपल्या Gmail इनबॉक्समधील ईमेल मोठ्या प्रमाणात कसे हटवायचे?

यासाठी तुम्हाला प्रथम अशा ईमेल्सला सेव्ह करुन किंवा बाजूला ठेवावी लेगेल, ज्याला तुम्हाला डिलीट करायचे नाही आहे. यासाठी तुम्हाला अशा ईमेल्सला अनरिड करावे लागेल किंवा त्याला दुसऱ्या एका फोल्डरमध्ये सेव्ह करावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला तुमचा इनबॉक्स उघडावा लागेल आणि सर्च बारमध्ये is:read कमांड टाकून एंटर दाबावा लागेल. जीमेल तुम्ही आधी वाचलेल्या सर्व ईमेलची क्रमवारी लावतो आणि तुम्हाला दर्शवतो. त्यानंतर आता चेक बॉक्स पर्यायासह सर्व संदेश एकाच वेळी निवडा.

आता तुम्ही त्या 50 किंवा 100 मॅसेजला सिलेक्ट करा ज्याला Google ने परवानगी दिलेली आहे. त्यानंतर राखाडी रंगाच्या सिलेक्ट केलेल्या मॅसेजमध्ये “select all conversations that match this search” चा पर्याय तुम्हाला समोर मिळेल.

येथे, तुम्हाला हे पाहावे लागेल की, या सिलेक्ट केलेल्या मॅसेजमध्ये तुम्हीला जे ईमेल हवे आहे ते तर सिलेक्ट झाले नाही ना. जर असे ईमेल असेल तर त्याला अनचेक करा. 

आता आपण निवडलेले सर्व वाचलेले ईमेल हटवण्यासाठी टास्कबारवरील ट्रॅशच्या आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा आपण ट्रॅश चिन्हावर क्लिक करता, तेव्हा Gmail आपल्याला मोठ्या प्रमाणात ईमेल हटविण्यासंबधीत एक मॅसेज पाठवतो. एकदा आपण त्यावर ओके क्लिक केले तर, सर्व निवडलेल्या ईमेल ट्रॅशमध्ये जातील.

या प्रक्रियेला थोडा वेळ लागू लागू शकतो कारण, आपण किती मेल हटवू इच्छिता आणि कोणते मेल ठेवायचे आहे, यावर अवलंबून थोडा वेळ लागू शकेल, परंतु त्या बदल्यात आपल्याला एक स्वच्छ आणि उत्कृष्ट जीमेल इनबॉक्स मिळेल.