Side Effects of Headphones: सध्याचं युग तंत्रज्ञानाचं असून शहरापासून ते गावखेड्यापर्यंत आणि मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. मोबाईल म्हणजे आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटकच झाला आहे. प्रवास करताना, जेवताना, झोपताना प्रत्येक वेळी हातात मोबाईल लागतो. एखाद्या व्यक्तीने आपण मोबाईल वापरत नाही असं सांगितलं तर प्रत्येकजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहतो. याचं कारण मोबाईल म्हणजे तुम्ही अत्याधुनिक असल्याचं लक्षण असतं. दुसरं म्हणजे आज जग इतक्या वेगाने पुढे जात असताना त्याच्यासोबत राहायचं असेल तर मोबाईल आवश्यक असतो. पण या मोबाईलसह अनेक दुष्परिणामही सोबत येतात.
आजकाल रस्त्यावर, रेल्वे स्थानकं, कोचिंग सेंटर, कॉलेज, शाळा सगळीकडे तुम्हाला लोक हेडफोन-ईअरफोन घालून फिरताना दिसतात. गाणी ऐकण्यासाठी, व्हिडीओ, चित्रपट पाहण्यासाठी हे हेडफोन वापरले जातात. पण हेडफोनुळे आपल्याला आजुबाजूच्या जगात काय सुरु आहे हे समजतच नाही. अनेकदा ही गरज असते तर काही वेळा मात्र फॅशन म्हणूनच वापरलं जातं. पण असं करत तुम्ही वेळेआधी बहिरे होण्यासाठी आमंत्रण देत आहात. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, 2050 पर्यंत जगभरातील 100 कोटींपेक्षा जास्त तरुण बहिरे होऊ शकतात.
जर तुम्हीदेखील हेडफोन-ईअरफोनचा वापर करत असाल तर त्याच्या दुष्परिणामांचा कधी विचार केला नसेल. हेडफोन, ईअरफोन, ईअरबर्ड्स आपल्या आरोग्यावर परिणाम करत असून त्याला गोड विष म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फॅशन म्हणा किंवा आवड पण हेडफोनचा वापर येणाऱ्या पिढीला बहिरं करेल.
जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, 2050 पर्यंत जगातील 100 कोटी लोक बहिरे होतील. यातील 12 ते 35 वर्ष वयोगटातील तरुण असतील. तसंच रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, चारपैरी एक तरुण हेडफोन-ईअरफोनच्या अती वापरामुळे बहिरा झालेला असेल.
संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सध्या 12 ते 35 वर्षं वयोगटातील सुमारे 50 कोटी लोकांना विविध कारणांमुळे बहिरेपणाचा त्रास होत आहे. यापैकी 25 टक्के लोक सतत ईअरफोन, ईअरबड्स किंवा हेडफोनवर मोठ्या आवाजात काहीतरी ऐकत असतात. सुमारे 50 टक्के लोक आजुबाजूला वाजणार्या मोठ्या आवाजातील संगीत, क्लब, डिस्कोथेक, सिनेमा, बार किंवा इतर कोणत्याही मोठ्या आवाजाच्या दीर्घकाळापर्यंत संपर्कात आल्याने बहिरे होत आहेत.
कोणत्याही वैयक्तिक उपकरणांमधील आवाज पातळी 75 डेसिबल (db) ते 136 डेसिबल पर्यंत असते. ही पातळी वेगवेगळ्या देशांमध्ये भिन्न असू शकते. सरासरी, आवाज 75 डेसिबल ते 105 डेसिबलदरम्यान असावा. सामान्यतः ऍपल वॉच जेव्हा 90 पेक्षा जास्त डेसिबल असेल तेव्हा अलर्ट जारी करतं. कानांना सुरक्षित ठेवायचं असेल तर 20 ते 30 डेसिबल सर्वात योग्य आहे. या आवाजात दोन लोक शांतपणे बसून चर्चा करु शकतात. यापेक्षा जास्त आवाजाच्या संपर्कात राहिल्याने कानांच्या पेशींचं नुकसान होतं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपकरणांच्या वापरामुळे येणारा बहिरेपणा कधीच बरा होत नाही. मोठ्या आवाजाच्या सतत आणि दीर्घकाळापर्यंत संपर्कात राहिल्याने हाय फ्रिक्वेन्सी नर्व्हचं नुकसान होते. त्याच्यावर शस्त्रक्रिया किंवा औषध नाही. त्यामुळे बहिरेपणा टाळण्यासाठी प्रतिबंध हाच उपाय आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read MoreBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.