Smartphone Internet : प्रवासात अनेकदा मोबाईलमधील इंटरनेट (Mobile Internet) नीट काम करत नाही किंवा स्लो चालतं. ट्रेन किंवा बसमधून (Travel) प्रवास करत असताना असं अनेकदा होतं. अशा वेळेस अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच संतापही सहन करावा लागतो. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला एक ट्रीक सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या मोबाईलमधील इंटरनेट सुस्साट धावेल. (internet is running intermittently in smartphone so do this setting know details)
ज्या सिम कार्डवर इंटरनेट सुरु आहे तो सिम स्लॉट वनमध्ये ठेवा. सिम या वन स्लॉटमध्ये ठेवल्यास सुपरफास्ट इंटरनेट मिळतं. असं केले तर हायस्पीड इंटरनेट मिळण्याची शक्यता जास्त असते.
प्रवासादरम्यान हार्ड कव्हर काढण्याचा प्रयत्न करा. हार्ड कव्हरचा नेटवर्कवर परिणाम होतो. जर तुम्ही कायम प्रवास करत असाल, तर काही काळ हे कव्हर वापरू नका. त्यामुळे इंटरनेटचा वेग खूपच कमी होतो.
स्मार्टफोनचे बॅकग्राउंड अॅप्स बंद केले नसतील तर प्रवासादरम्यान ते बंद करा. कारण हे App डेटा खातात. त्यामुळे इंटरनेट स्पीड खूप कमी होतो. या टिप्स फॉलो केल्यास स्मार्ट फोनमधील इंटरनेट स्पीडवर फारसा परिणाम होत नाही.