जावाची भारतीय बाजारात एन्ट्री, जाणून घ्या किंमत

फिचर्स आणि किंमत 

जावाची भारतीय बाजारात एन्ट्री, जाणून घ्या किंमत  title=

मुंबई : मोटरसायकल ब्रँड Jawa ने पुन्हा एकदा भारतीय बाजारात एन्ट्री घेतली आहे. कंपनीने 3 मॉडेल लाँच केले आहे. यामध्ये 2 मॉडेल 293 सीसी इंजीन असून जावा पर्क 334 सीसी आहे. हे इंजिन बीएस 6 प्रौद्योगिकावर आधारित असून जावा भारत आणि इतर देशातील लोकप्रिय ब्रँड आहे. 1996 मध्ये कंपनीने भारतातील ऑपरेशन थांबवली आहेत. 

आता जावा महिंद्रा अॅण्ड महिन्द्रासोबत भारतीय बाजारात पुन्हा एकदा आली आहे. जावा रेंजचं क्लासिक वेरिएंट असून कंपनीने याला लाल रंगात बाजारात आणलं आहे. तर जावा 42 सफेद रंगात आली आहे. जावा पर्क बॉबर कस्टम रंगात असून 15 नोव्हेंबर रोजी लाँच केली आहे. मात्र कस्टम बॉबर 2019 मध्ये बाजारात येणार आहे. 

जावाने या मोटारसायकला अशा पद्धतीने डिझाइन केलं आहे की, या बाईकला बघताच तुम्हाला 80 ते 90 दशकाची आठवण येईल. विटेंज लुक्ससोबत कंपनीने टेक्निकल या गाडीला अधिक अॅडव्हान्स आणि दमदार बनवलं आहे. 

Jawa ची किंमत 

Jawa 42 सर्वात स्वस्त बाईक आहे. याची किंमत 1.55 लाख रुपये असून Jawa ची किंमत 1.64 लाख रुपये आहे. Jawa Perak कस्टम बॉबरची किंमत 1.89 लाख रुपये आहे. हा दिल्ली एक्सशोरूममधील किंमत आहे