Reliance Jio ने आपली 5G सेवा सुरू केली आहे. वापरकर्त्यांनी 5G सेवा वापरण्यास सुरूवात देखील केली आहे. मात्र असे अनेक लोक आहेत ज्यांना 5G वापरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जर तुम्ही देखील या लोकांपैकी एक असाल तर जाणून घ्या यामागचे कारण काय असू शकते. (jio 5g servic not working mistakes to avoid check jio 5g plans use smartphone)
देशभरात 1 ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये रिलायन्स जिओ ही पहिली टेलिकॉम कंपनी होती जिने 5G सेवा केव्हा, कुठे आणि कशी सुरू करणार आहेत हे सर्वांना स्पष्टपणे सांगितले. काही दिवसांपूर्वी जिओने देशातील चार शहरांमध्ये Jio 5G सेवा सुरू केली असून लोकांनी त्याचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे.
यादरम्यान असे बरेच लोक आहेत जे या सेवेचा वापर करू शकत नाहीत आणि त्यांना त्यांच्या बाजूने काय चालले आहे हे देखील समजत नाही. Jio 5G स्मार्टफोनवर नीट काम न करण्यामागचे कारण काय असू शकते ते जाणून घेऊया.
5G सेवा वापरण्यासाठी फक्त 5G स्मार्टफोन असून उपयोग नाही. ही सेवा सुरू करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. Airtel, Jio आणि Vodafone Idea (Vi) वापरकर्त्यांना त्यांच्या फोनमध्ये 5G चालवण्यासाठी काही सेटीग्ज कराव्या लागतील.
Jio 5G शिवाय चालणार नाही
कोणत्याही कंपनीचे Jio 5G किंवा 5G नेटवर्क वापरण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5G स्मार्टफोन. जर तुमचा स्मार्टफोन फक्त 4G सेवा आणि त्यापेक्षा कमी नेटवर्कला सपोर्ट करत असेल तर कोणत्याही परिस्थितीत 5G तुमच्या फोनवर काम करणार नाही. यासाठी तुम्हाला एक फोन घ्यावा लागेल ज्यावर 5G काम करेल. फोनच्या सेटिंग्जमध्ये 'नेटवर्क'मध्ये जाऊन तुम्ही हे सहज तपासू शकता. स्मार्टफोनवर 5G, 5G सहत्वता वापरणे सर्वात महत्त्वाचे आहे.
वाचा : IND-W vs PAK-W : मोबाईलवर पाहा फ्रीमध्ये Ind Vs Pak Live T20 सामना; फक्त करा ‘हे’ काम
Jio 5G फक्त या शहरांमध्ये काम करेल
Jio 5G सध्या संपूर्ण देशात रिलीज झालेला नाही, फक्त चार शहरांमध्ये वापरला जाऊ शकतो. जर तुम्ही दिल्ली, कोलकाता, मुंबई किंवा वाराणसीचे रहिवासी असाल तर तुम्ही यावेळी फक्त Jio 5G वापरू शकता. याशिवाय, तुम्ही कोणत्याही शहरात राहत असाल तर तुम्हाला अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल. कारण कंपनीचा दावा आहे की, 2023 च्या अखेरीस 5G संपूर्ण देशात रिलीज होईल.
Jio 5G प्लॅन वापरा
Jio 5G वापरण्यासाठी तुमच्याकडे 5G योजना देखील असणे आवश्यक आहे. अधिकृतपणे याबद्दल कोणतीही माहिती नाही, परंतु TelecomTalk नुसार, Jio 5G फक्त 239 रुपयांच्या वरच्या प्लॅनवर काम करते. याचा अर्थ Jio 5G वापरण्यासाठी तुम्हाला योग्य 5G प्लॅन देखील मिळवावा लागेल.