नवीन वर्षात जिओ करणार आणखी एक धमाका

रिलायंस जिओने पुन्हा एकदा नवा धमाका करण्याचा विचार केला आहे. मध्यम वर्गाच्या लोकांना लक्षात घेऊन ही ऑफर आणली जाणार आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 21, 2018, 01:39 PM IST
नवीन वर्षात जिओ करणार आणखी एक धमाका title=

नवी दिल्ली : रिलायंस जिओने पुन्हा एकदा नवा धमाका करण्याचा विचार केला आहे. मध्यम वर्गाच्या लोकांना लक्षात घेऊन ही ऑफर आणली जाणार आहे.

नवीन ऑफर

जिओने यासाठी रणनीती बनवायला सुरुवात केली आहे. कंपनीने आपल्या सब्सक्राइबर्सला डिजिटल कूपन ऑफर देण्याची योजना आखली आहे. याच्या माध्यमातून ते किराणा स्टोर्समधून डिस्काउंट रेटमध्ये वस्तू खरेदी करु शकता.

जिओची मध्यस्थीची भूमिका

जिओकडून डिस्काउंटवर आपला पैसा खर्च नाही केला जाणार. कंपनी आणि किराणा दुकानांच्या मध्ये जिओ मध्यस्थीची भूमिका बजावणार आहे. यामुळे उत्पादन कंपन्यांना मोफत पब्लिसिटी मिळेल. तर किराणा दुकानदाराला देखील फायदा होईल. यामुळे जिओला आपल्या ग्राहकांना आपल्याकडे कायम ठेवण्यात मदत मिळेल.

ऑफर होणार लॉन्च

यावर्षी ही योजना लॉन्च करण्यापूर्वी कंपनी काही शहरांमध्ये ही योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून चालवणार आहे. याआधी सप्टेंबर २०१६ मध्ये रिलायंस जिओने २६ अरब डॉलरच्या टेलिकॉम मार्केटमध्ये एंट्री करत भूकंप आणला होता. तेव्हा पासून सुरुवातीला रिलायंस जिओला नुकसान होत होतं. पण डिसेंबरनंतर कंपनीला पहिला फायदा झाला. जिओला ५०४ कोटींना मोठा फायदा झाला.