मुंबई : Jio 4G Phone Booking : रिलायन्स जिओ के ४ जी फिचर फोनची आज १५ ऑगस्ट पासून बीटा टेस्टिंग सुरू होत आहे. बीटा टेस्टिंग दरम्यान हा फोन वापरला जाणार आहे.
रिलायन्स जिओ के ४ जी फोनची प्री बुकिंग २४ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. तेव्हा आता कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजे www.jio.com वर प्री बुकिंगसाठी रजिस्ट्रेशन सुरू केलं आहे. प्री बुकिंग रजिस्ट्रेशनसाठी कंपनी आपल्या साइटवर जाऊन काही डिटेल्स भरायचे आहेत. जसे की तुमचे नाव, मोबाइल नंबर, ईमेल आयडी आणि पिन कोडय यानंतर युझर्सकडे याबाबतचा एक कन्फर्मेशन मेल आणि मॅसेज येईल. या फोनची प्री बुकिंग ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करू शकतो. २४ ऑगस्ट नंतर रिलायन्स जिओचे मायजियो अॅपच्या सहाय्याने फिचर फोनची ऑनलाइन बुकिंग केली जाऊ शकते. तिथेच तुम्ही जिओच्या कोणत्या स्टोरमध्ये जाऊन ऑफलाइन बुकिंग देखील करू शकता.
जिओ फोनची बुकिंग करताना तुम्हाला अधिकृत जिओ फोन विक्रेत्याकडे आधार कार्डची एक झेरॉक्स द्यावी लागेल. एक व्यक्ती एका आधार कार्डवर देशात एकच फोन खरेदी करु शकतो. त्यामुळे तुम्हाला अनेक फोन बुक करता येणार नाही. आधार कार्ड दिल्यानंतर नोंदणी होईल, त्यानंतर टोकण नंबर देण्यात येईल. हा टोकण नंबर फोन घेताना उपयोगी येईल. त्यामुळे एक व्यक्ती एका वेळी एकच फोन विकत घेऊ शकते.
जिओ फोन हा शून्य रुपये किंमतीमध्ये असेल, मात्र अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये द्यावे लागतील, अशी घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली होती. मात्र ऑफलाईन फोन खरेदी करताना तुम्हाला आधार नंबर व्यतिरिक्त कशाचीही गरज नाही. फोन हातात पडेल तेव्हा 1500 रुपये द्यावे लागतील. हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील. त्यामुळे हा फोन ० रुपयांत तुम्हाला मिळणार आहे.
जिओ फोनची आत्ता बुकिंग केल्यास डिलीव्हरी 1 ते 4 सप्टेंबर या काळात मिळण्याची शक्यता आहे. पुढे बुकिंगची संख्या वाढल्यास फोन उशीराही मिळू शकतो. आधी बुक करणाऱ्या ग्राहकालाच अगोदर फोन मिळणार आहे. त्यामुळे वर दिलेल्या ऑगस्टपासून माय जिओ अॅप, जिओची वेबसाईट किंवा रिलायन्स स्टोअर्समध्ये जाऊन बुक करु शकता.
जिओचा हा फीचर फोन आहे. यामध्ये काही मल्टीमीडिया अॅप्स असतील. तर 4 G VoLTE कॉलिंग असेल. तर केबलद्वारे टीव्हीला फोन जोडण्यासाठी टेलीव्हिजन सेटही मिळणार आहे. जिओच्या कर्मचाऱ्यांकडून आता या सर्व फीचर्सची चाचणी केली जाणार आहे.
ग्राहकांना हा फोन घेतल्यानंतर १५३ रुपयांमध्ये २८ दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा मिळणार आहे. तर टीव्हीला फोन जोडता यावा, यासाठी ‘जिओ फोन टीव्ही केबल’ दिली जाईल. फोन टीव्हीला जोडायचा असल्यास ३०९ रुपयांचा प्लॅन घ्यावा लागेल.
जिओचा हा सिंगल सिम स्लॉट फोन आहे. यामध्ये २.४ इंच आकाराची स्क्रीन, टॉर्चलाईट, एफएम, २२ भारतीय भाषांमध्ये व्हॉईस कमांड असे फीचर्स असतील. दरम्यान सध्या तरी या फोनमध्ये व्हॉट्सअॅप सपोर्टीव्ह नसल्याची माहिती आहे. तर डिजीटल पेमेंट करण्यासाठी एनएफसी सपोर्ट असेल, हे फीचर ओटीए सॉफ्टवेअर अपग्रेडनंतर मिळेल.