लाँच होताच 'या' SUV ने घातला धुमाकूळ; फक्त एका महिन्यात 37 हजारांपेक्षा जास्त गाड्यांचं बुकिंग, किंमत किती?

Kia Seltos Facelift मध्ये कंपनीने पॅनोरमिक सनरुफ, सर्व चाकांमध्ये डिस्क ब्रेक, पनोरमिक डिस्प्ले, 26.03 सेमी एचडी टचस्क्रीन नेव्हिगेशन, ड्युअल झोन फुली ऑटोमॅटिक एअर कंडिशनसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. या एसयुव्ही सुरक्षेचे पॉवरफूल फिचर्स देण्यात आले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Aug 16, 2023, 07:58 PM IST
लाँच होताच 'या' SUV ने घातला धुमाकूळ; फक्त एका महिन्यात 37 हजारांपेक्षा जास्त गाड्यांचं बुकिंग, किंमत किती? title=

Kia ने एक महिन्यापूर्वी भारतीय बाजारपेठेत आपली प्रसिद्ध एसयुव्ही Kia Seltos च्या फेसलिफ्ट मॉडेलला सादर केलं होतं. नव्या Seltos Facelift ची सुरुवातीची किंमत 10 लाख 90 हजार आहे. टॉप स्पेक ऑटोमॅटिक व्हेरियंटसाठी मात्र 19 लाख 80 हजार मोजावे लागणार आहेत. ही एसयुव्ही बाजारात येताच ग्राहकांनी बुकिंगसाठी अक्षऱश: उड्या मारण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फक्त एका महिन्यात या एसयुव्हीच्या 31 हजार 716 युनिट्सची बुकिंग झाली आहे. कंपनीने या एसयुव्हीत अनेक बदल केले आहेत. जे आधीच्या मॉडेलच्या तुलनेत या एसयुव्हीला दर्जेदार बनवत आहेत. 

5 लाख गाड्यांची विक्री

Kia ने 2019 मध्ये Seltos सह भारतीय बाजारपेठेत पहिलं पाऊल ठेवलं होतं. जेव्हा ही एसयुव्ही बाजारात आणण्यात आली तेव्हापासून 5 लाखांपेक्षा अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. या एसयुव्हीला भारतातील पहिली कनेक्टेड एसयुव्ही म्हणून सादर करण्यात आलं होतं, ज्याच्यात अॅडव्हान्स फिचर्स आणि तंत्रज्ञान देण्यात आलं होतं. आता याच्या फेसलिफ्ट मॉडेललाही आधुनिक करण्यात आलं आहे. यासह यामध्ये सेफ्टी फिचर्सही देण्यात आले आहेत. 

किमत किती?

सेल्टॉसची एक्स शोरुम किंमत 10.90 लाखांपासून ते 19.80 लाखांपर्यंत आहे. ग्राहक कार खरेदी करताना मिड व्हेरियंटला जास्त पसंती देतात. जेणेकरुन कार एकदमच बेसिक नसेल आणि किमान काही फिचर्सचा लाभ घेता येईल. अशा स्थितीत जर या कारच्या मिड व्हेरियंटची किंमत 15 लाख ठेवण्यात आली तर 32 हजार युनिट्सची एकूण किंमत 4800 कोटींच्या आसपास असेल. ही एसयुव्ही किती लोकप्रिय आहे याचा अंदाज यावरुनच येत आहे की, ज्या दिवशी बुकिंगला सुरुवात झाली तेव्हा फक्त 24 तासांत 13 हजार 400 युनिट्सची बुकिंग झाली होती. 

कशी आहे नवी Kia Seltos:

या एसयुव्हीत 1.5 लीटर क्षमतेचं नवं पॉवरफूल T-GDi इंजिन देण्यात आलं आहे. जे 160ps ची पॉवर आणि 253 Nm चा टॉर्क जनरेट करतं. फ्रंटला नव्या डिझाइनचं मोठं ग्रील, नवे हेडलँप, LED चे टाइम रनिंग लाइट्स, नवे टेल लँप, पॅनोरमिक सनरुफ असे फिचर्स देण्यात आले आहेत. 

नव्या सेल्टोस फेसलिफ्टमध्ये 26.04 सेमीच्या फुली डिजिटल क्लस्टरसह ड्यूल स्क्रीन पैनोरमिक डिस्प्ले, 26.03 सेमी एचडी टचस्क्रीन नेविगेशन, ड्यूल जोन फुली ऑटोमैटिक एअर कंडीशनर आणि 18 इंच केमी सेमी क्रिस्‍टिकल कट ग्लॉसी ब्लॅक अलॉय व्हील्स मिळते. या व्यतिरिक्त फीचर्स म्हणून कंपनीने कार डुअल पैन पैन सनरूफ समाविष्ट केले आहे.