महिंद्रा आणत आहे सर्वात छोटा ट्रॅक्टर; आनंद महिंद्रा म्हणालेत, तुम्ही कल्पना करु शकत नाही!

वाहन निर्मिती करणारी कंपनी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा टॉय ट्रक्टर बाजारात आणण्याच्या तयारीला लागली आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: Aug 13, 2019, 12:59 PM IST
महिंद्रा आणत आहे सर्वात छोटा ट्रॅक्टर; आनंद महिंद्रा म्हणालेत, तुम्ही कल्पना करु शकत नाही! title=

मुंबई : वाहन निर्मिती करणारी कंपनी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा टॉय ट्रक्टर बाजारात आणण्याच्या तयारीला लागली आहे. महिंद्रा कंपनीचा हा सर्वात छोटा ट्रॅक्टर आहे. कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा म्हणालेत, तुम्ही याची कल्पना करु शकणार नाहीत की, इतका लहान असेल. आनंद महिंद्रा यांनी याबाबत ट्विट केले आहे. कृषी प्रधान देशात युवकांना डोळ्यासमोर ठेवून हा टॉय ट्रॅक्टर तयार करण्यात येत आहे. युवकांचे शेतीत योगदान मिळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

देशातील तरूण जे शेतीत योगदान देत आहेत त्यांच्यासाठी ही एक  चांगली भेट असणार आहे. महिंद्राचा हा नॅनो ट्रॅक्टर पूर्णपणे इलेक्ट्रिक असणार आहे. तो रिमोटच्या मतदीने नियंत्रित केला जाऊ शकतो. या ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करणे अधिक सुलभ होईल. हा एक १२ व्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असून ३ (फॉरवर्ड + रिव्हर्स) गिअर ट्रान्समिशन आहे. या ट्रॅक्टरमध्ये स्पीड लॉक फंक्शनदेखील समाविष्ट केले गेले आहे. सध्या या ट्रॅक्टरच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हिंद्रा आणि महिंद्रा (एम अॅण्ड एम) इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात वेगाने विस्तार करण्याची योजना आखत आहेत. अलीकडेच कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी कंपनीच्या ७३ व्या वार्षिक एजीएममध्ये सांगितले होते की, वाहन उद्योगात एक 'मूलभूत बदल' होत आहे आणि त्या बदलाचा फायदा घेण्याची वेळ आली आहे. येत्या अडीच वर्षात कंपनी ३-४ इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे.