Mahindra ने लॉन्च केली स्वस्तात मस्त 3 व्हीलर; किंमत फक्त…

महिंद्राने आता नवीन तीन चाकी मालवाहू (वस्तू वाहन) पॉवरवर चालणारी बॅटरी लॉन्च केली आहे. त्याला महिंद्रा झोर ग्रँड इलेक्ट्रिक असे नाव देण्यात आले आहे. या वाहनाची किंमत 3.60 लाख रुपयांपासून सुरू होते. किंमत फक्त 3.60 लाख, पूर्ण चार्जमध्ये 100KM धावेल. 

Updated: Aug 30, 2022, 12:37 PM IST
Mahindra ने लॉन्च केली स्वस्तात मस्त 3 व्हीलर; किंमत फक्त…  title=

Mahindra Zor Grand Electric 3-Wheeler : देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असणारी महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने भारतात आपली नवीन तीन-चाकी इलेक्ट्रिक कार्गो झोर ग्रँड लॉन्च केली आहे. या कंपनीने अलीकडेच आपल्या 5 इलेक्ट्रिक कार सादर केल्या असून इलेक्ट्रिक कार लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. महिंद्राने आता नवीन तीन चाकी मालवाहू (वस्तू वाहन) पॉवरवर चालणारी बॅटरी लॉन्च केली आहे. त्याला महिंद्रा झोर ग्रँड इलेक्ट्रिक (Mahindra Zor Grand Electric 3-Wheeler) असे नाव देण्यात आले आहे.

महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (MEML) ने आज आपली नवीन इलेक्ट्रिक कार्गो थ्री-व्हीलर झोर ग्रँड (Zor Grand) भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केली आहे, ज्याची किंमत रु.3.60 लाख (Ex-showroom, बंगलोर) आहे. 

Zor Grand या कार्गो सेगमेंटमध्ये नवीन इलेक्ट्रिक 3-व्हीलर लॉन्च करून कंपनीला खूप आशा आहेत. विशेष म्हणजे, झोर ग्रँड इलेक्ट्रिक 3-व्हीलर लाँच करण्यापूर्वी, 12,000 युनिट्स आधीच झाले आहेत. कंपनीला महिंद्र लॉजिस्टिक्स, मॅजेन्टा ईव्ही सोल्युशन्स, मूव्हिंग ईव्ही नाऊ यांसारख्या टॉप लॉजिस्टिक कंपन्यांसोबत धोरणात्मक सामंजस्य कराराद्वारे हे बुकिंग मिळालं आहे. याची किंमत रु.3.60 लाख (Ex-showroom, बंगलोर) आहे.  

महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे (MEML) सीईओ सुमन मिश्रा, यांनी मीडियाला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “लास्ट माईल डिलिव्हरी आणि लॉजिस्टिक सेगमेंटला विश्वासार्ह आणि इकोनॉमिकल कार्गो आणि हाय क्वालिटीच्या इलेक्ट्रिक वाहनांची गरज भासू लागली आहे. या मागण्या प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या गरजा पूर्ण करण्यासाठी, आम्ही न्यू झोर ग्रँड (Zor Grand) लॉन्च केली आहे. ही पॉवर – पॅक्ड परफॉर्मन्स देते आणि आम्हाला ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम ठरते. 

इलेक्ट्रिक कार्गोमुळे पैशांची बचत होऊ शकते

याचे वैशिष्ट्य म्हणजे की,  डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, GPS, ऑफबोर्ड चार्जर, केबिन लाइट, मोबाइल होल्डर, लॉक करण्यायोग्य ग्लोव्ह बॉक्स, रिव्हर्स बजर, स्पेअर व्हील प्रोव्हिजन, धोका निर्देशक आदिचा समावेश आहे. डिझेल मालवाहूच्या तुलनेत ५ वर्षात या इलेक्ट्रिक कार्गोमुळे ६ लाख रुपयांची बचत होईल, असा कंपनीचा दावा आहे. तर 3-चाकी मालवाहू मालाच्या तुलनेत सीएनजीमुळे 3 लाख रुपयांची बचत होईल.