मारुती अल्टो कारने पुन्हा बनवला मेगा रेकॉर्ड

मारुती कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक असलेल्या 'अल्टो'ने पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड बनवला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 5, 2018, 07:07 PM IST
मारुती अल्टो कारने पुन्हा बनवला मेगा रेकॉर्ड title=

नवी दिल्ली : मारुती कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक असलेल्या 'अल्टो'ने पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड बनवला आहे.

कोट्यावधी भारतीयांची मनं जिंकणाऱ्या मारुती अल्टो कारने विक्रीत एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. अल्टो कारच्या विक्रीने ३५ लाख युनिटचा टप्पा पार केला आहे. अल्टो कार कंपनीची सर्वाधिक विक्री झालेली कार आहे. 

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २०१७-१८ मध्ये अल्टो ब्रँडचा ग्रोथ ६ टक्के आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात या मॉडलचा बाजारातील हिस्सा ३३ टक्के आहे. 

सर्वाधिक विक्री झालेली कार

कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक आरएस कल्सी यांनी सांगितले की, अल्टो गेल्या १४ वर्षांपासून घरगुती बाजारात सर्वाधिक विक्री झालेली कार आहे. २०१७-१८ या वर्षात जवळपास ५५ टक्के ग्राहकांनी आपली पहिली कार ही अल्टो कारच्या रुपात खरेदी केली. तर, २५ टक्के ग्राहक असे आहेत ज्यांनी अतिरिक्त वाहनाच्या रुपात अल्टो कार खरेदी केली आहे.

४४ टक्के ग्राहक ३५ वर्षांखालील वयोगटातील

कल्सी यांनी सांगितले की, ४४ टक्के अल्टो कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं वय हे ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. गेल्या तीन वर्षांत या वयोगटातील ग्राहकांच्या अल्टो कारच्या खरेदीत चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

कंपनीतर्फे डिस्काऊंट

नुकतचं कंपनीने सर्वाधिक विक्री होणाऱ्या मारुती अल्टो ८०० या गाडीवर ४५ हजार रुपयांची सूट दिली आहे. तसेच जर तुम्ही सरकारी कर्मचारी आहात तर तुम्हला कंपनीतर्फे ५१०० रुपयांची अतिरिक्त सूट देण्यात येत आहे.

कारची सुरुवाती किंमत २.५१ लाख रुपये

अल्टो कारची दिल्लीतील एक्स शोरुममध्ये किंमत २.५१ लाख रुपयांपासून सुरु होत आहे. अल्टो ८०० पेट्रोल आणि CNG या दोन्ही वर्जनमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने दावा केला आहे की, ८०० सीसी इंजिन असलेल्या या कारच्या पेट्रोल व्हर्जन २४.७० किमी प्रती लीटरचा मायलेज देते. तर, सीएनजी मॉडल ३३.४४ किमी प्रती किग्रॅचा मायलेज देते.