Maruti Suzuki Recall: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ने त्यांच्या डिझायर एस टूर सेडानची (Dzire S Tour sedan) रिकॉल (recall) घोषणा केली आहे.
मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक कार्स भारतीय बाजारात धुमाकूळ घालत आहेत. तसेच अनेक कार्सची परदेशात मोठी निर्यात देखील होते. दरम्यान, मारुती कंपनीच्या एका कारचे काही युनिट्स कंपनीने परत मागवले आहेत. मारुती सुझुकी डिझायर कारच्या एस टूर व्हेरिएंटचे अनेक युनिट्स कंपनीने रिकॉल केले आहेत.
मारुती डिझायरचं हे टूर व्हर्जन कॅब म्हणून मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. देशभरातील बहुतांश टॅक्सी चालक, ऑनलाईन कॅब सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या या कारचा वापर करतात. ओला, उबर किंवा इतर कॅब सर्व्हिसमध्ये ही कार पाहायला मिळते.
कारमधील एअरबॅग युनिटमधील (airbag units) दोषामुळे कार निर्माता डिझायर टूर एस सेडानच्या 166 युनिट्स परत मागवत आहे. मारुती सुझुकीने सांगितले की एअरबॅग कंट्रोल युनिट बदलण्याची गरज आहे. रिकॉलमुळे प्रभावित झालेल्या युनिट्समध्ये नवीन एअरबॅग्ज बसवण्याचा खर्च कार निर्माता उचलेल.
मारुती सुझुकीने परत मागवलेली सेडान या महिन्याच्या सुरुवातीला 6 ते 16 ऑगस्ट दरम्यान तयार करण्यात आली होती. मारुती सुझुकीने बुधवारी नियामक फाइलिंगमध्ये एक निवेदन जारी केले, रिकॉल आणि त्यामागील कारणाची पुष्टी केली.
कार निर्मात्याने सांगितले की, एअरबॅग कंट्रोल युनिट्स बदलण्यासाठी रिकॉल करणे आवश्यक आहे. कारण त्यात संभाव्य दोष असल्याचा संशय आहे. मारुती सुझुकीने सांगितले की, भविष्यात ती दुरुस्त केली नाही तर भविष्यात एअरबॅग उघडताना हा दोष आणखीनच वाढू शकतो.